अजितदादा अन् शरद पवार कधीही एकत्र येतील, अजितदादांच्या निकटवर्तीयाचे मोठे विधान…
Narhari Zirwal : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Elctipon) निकाल शनिवारी जाहीर झाला. भाजप (BJP) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. महायुतीने 230 जागा जिंकल्या. यात भाजप 132 जागा, शिंदे गट 57 जागा तर अजित पवार (Ajit Pawar) गटाने 41 जागांवर विजय मिळवला. मात्र, मविआला केवळ 46 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे राज्यात महायुतीची (Mahayuti) सत्ता येणार हे निश्चित आहे. अशातच नरहळी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मोठं विधान केलं.
Video: नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं.
नरहरी झिरवाळ यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का, असा सवाल केला असता झिरवाळ म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा किंवा अपेक्षा म्हणण्यापेक्षा जनतेचीही इच्छा आहे. परंतू शेवटी महायुतीचे नेते बसून सीएमपदाबाबत निर्णय घेतील. पंतप्रधान मोदी, अमित शाह हे बसून जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य करावा लागेल. पण माझी विनंती आहे की, आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. पण भाजपचं संख्याबळ मोठं आहे. तरीही दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं, असं झिरवाळ म्हणाले.
पुढं ते म्हणाले, मी दररोज मंत्रालयात जात असतो. त्यामुळे आता मला कोणतंही एखादं मंत्रिपद दिलं चालेल. पण द्यावं ही विनंती, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार-अजितदादांबाबतही मोठं विधान केलं. शरद पवार, अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र सनतो. या गोष्टी सुरूच असतात, असं झिरवाळ यांनी म्हटलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा सातत्याने करत आहेत. अशातच राजधानी दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यामुळं मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.