NCP : अजितदादांचं बंड यशस्वी! दोन तृतीयांश आमदार सोबत: शरद पवारांना मोठा धक्का
NCP News : अजित पवार यांचं बंड यशस्वी झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आता शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर आलीय. अजित पवार गटाला 42 आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आलीय तर फक्त 11 आमदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच बहुमत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आमदारांच्या बलाबलनंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातंय. (Nationalist Ajit Pawar? Ajit Dada has the support of 42 MLAs and 11 MLAs are with Sharad Saheb)
राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब, ‘त्या’ पत्राबद्दल पवारांच्या खास माणसाने केला खळबळजनक खुलासा…
शपथविधीला हजेरी लावल्यानंतर अजित पवार समर्थक आमदारांनी अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी भेट दिली आहे. यामध्ये अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, अनिकेत तटकरे, सतिष चव्हाण हे आमदार अजितदादांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळालंय. अजितदादा समर्थकांची सकाळपासूनच भेटीसाठी रेलचेल सुरु आहे. शपथविधीदरम्यान, अजित पवारांना 35 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर पक्षातील इतर आमदारांनी दादांची आज भेट घेतली. आजच्या भेटीनंतर इतर आमदार अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरकीकडे शरद पवार मैदानात उतरत साताऱ्यात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. यावेळी शशिकांत शिंदे, बाबाजानी दुर्राणी, एकनाथ खडसे, अरुण लाड यांनीही उपस्थिती दर्शवत शरद पवारांना पाठिंबा दिल्याचं दिसून आलं होतं. एकंदरीत पाहता राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु होती. ही धुसफूस अखेर दोन-तीन दिवसांपूर्वी उफाळून आली. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निर्णयाबाबतच्या बैठकीआधीच अजित पवारांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत राजकीय भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार यांनी आपल्या 40 समर्थकांसह राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार समर्थकांच्या 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं.
बहुमत असताना अजितदादांना का घेतले? फडणवीसांनी न्याय दिलाच पाहिजे; शिंदे गटाचे आमदार भडकले
अजित पवारांच्या फुटीनंतर शरद पवारांनी आमचा अजित पवारांच्या कृतीला पाठिंबा नसल्याची भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह शपथ घेतलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाईची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. पण जयंत पाटलांच्या आधीच अजित पवारांनी जयंत पाटलांसह जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करण्याबाबतची मागणी केली होती.
Subodh Bhave:’…अन् त्या वास्तूला भेट देण्याचा योग’, सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट
अखेर बंडानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षासह चिन्हावरही दावा केलाय, एवढंच नाहीतर प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे तर महिला प्रदेशाध्यपदी रुपाली चाकणकरांची नियुक्ती केली आहे. या घडामोडी सुरु असतानाच काही आमदार पुन्हा माघारी फिरत शरद पवारांच्य गोटात सामिल झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर कोणत्या गटात कोणता आमदार? हे अस्पष्टच होतं, अखेर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत अजित पवारांना 42 आमदारांनी तर शरद पवार गटाला 11 आमदारांनी समर्थन दर्शवल्याचं समोर आलं आहे.