मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दाढी कुरुवाळत बसतात; अजितदादांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दाढी कुरुवाळत बसतात; अजितदादांची टीका

Ajit Pawar On Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढणाऱ्या या गुन्हेगारी घटनांची संख्या लक्षात घेता राज्यात पोलिसांचा (Police)वचक राहिला आहे का? असा खडा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी शिंदे-फडणवीसांना (Shinde-Fadnavis government)विचारला आहे. आत्महत्या, खून आदी वाढणाऱ्या संख्या रोखण्यात सरकार अपयशी ठरत असून, पोलिसांना कारवाईसाठी हवी तशी मोकळीक मिळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या कामत हस्तक्षेप वाढला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)म्हणतात की, सतत माझ्यावर तुम्ही टीका करता. तुम्ही काम करत नाही केवळ दाडी कुरवाळत बसतात, काम करा मी कौतुक करेल असंही अजित पवार म्हणाले. (ncp-anniversary-ajit-pawar-criticize-on-eknath-shinde)

दिल्लीतून येतानाच ठरवलं होतं सरकार बुडवायचं; छगन भुजबळांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल

अजित पवार म्हणाले की, आज शिंदे-फडणवीस सरकार पोलीस अधिकारी आणि शिपायांना त्यांचे कार्यकर्ते असल्यासारखे राबवायला सांगतात. या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. यामुळे राज्याचे देशासह जगभरात बदनामी होत आहे. या सर्व घटनांवर मुख्यमंत्री शिंदेंशी बोललं तर ते म्हणतात की, तुम्ही माझ्यावर नुसती टीका करतात असे म्हणतात. त्यावर अजितादादा म्हणाले की, तुम्ही (एकनाथ शिंदे) नुसतीच दाढी कुरवाळत बसता मग टीका करू नाहीतर काय करू अशी टिप्पणी केली.

विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा; संघटनेत कोणतही पद द्या, अजितदादांची CM पदाची तयारी सुरु

घडणाऱ्या घटनांवर त्वरीत कारवाई करून रिझल्ट द्या, मी तुमचं कौतुक करेल असेही अजित पवार म्हणाले. मुंबईत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेची ज्या पद्धतीने हत्या झाली ते ऐकून अंगाचा थरकाप उडत नाही का? सटकत नाही राग येत नाही असे एक ना अनेक प्रश्न अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून विचारले. या सर्व घटना घडत असताना सरकार काय झोपा काढतयं का? असा संतप्त सवाल यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

कोण ते उघडे नागडे शेणगोळ घेऊन आले; भुजबळांमधील ‘सत्यशोधक’ झाला जागा

त्याचवेळी अजित पवार म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संविधानाने सर्व धर्म समभाव सांगितला आहे. त्यामुळे माझं कार्यकर्त्यांना सांगणं आहे की, तुकारामाची गाथा निरुपण कार्यक्रम करावा, आपण कुठे कमी पडतोय हे लक्षात घ्या. आपण विदर्भात कमी पडतो. अजूनही मुंबईचा अध्यक्ष झालेला नाही. आपल्याला काय कुणाला विचारायला जायचं आहे का? आपण आनंदाचा दिवस साजरा करत असताना चिंतन करायला हवं. आपण भाकरी फिरवायची ठरवली आहे तर ती फिरलीच पाहिजे. ज्याने आता घोषणा दिली त्याच्या वार्डात आपला नगरसेवक आहे का? नुसत्या मोठ्या घोषणा द्यायच्या, असेही यावेळी कार्यकर्त्यांना ठणकावले.

राज्यात दंगल का घडतेय? त्याचा मास्टरमाईंड शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. धाराशिवमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. एका डॉक्टरचा व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं काय झालं आहे? समोर यायला हवं, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube