तुमच्यामुळं 15 वर्षांचं सरकार गेलं म्हणत भुजबळांनी चव्हाणांच्या डोक्यावर फोडलं खापर

तुमच्यामुळं 15 वर्षांचं सरकार गेलं म्हणत भुजबळांनी चव्हाणांच्या डोक्यावर फोडलं खापर

Chhagan Bhujbal On Prithviraj Chavan :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर तोंडसुख घेतले आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रवादीला भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला होता. यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांंनाच सुनावले आहे. पृथ्वीराज चव्हाणे हे मुख्यमंत्री असताना सरकार का गेले, असा सवाल त्यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये सुंदोपसुंदी चालू असल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या सामना दैनिकातून शरद पवारांना लक्ष करण्यात आले होते. त्यावर पवारांनी देखील योग्य शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचादेखील भरपत्रकार परिषदेमध्ये पाणउतारा केला. यानंतर आता छगन भुजबळांनी देखील चव्हाणांना सुनावले आहे.

Letsupp Special : चव्हाणांची राष्ट्रवादी विरोधाची `सुपारी` आणि शरद पवारांचा शब्दांचा अडकित्ता!

पंधरा वर्षे राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते. ते सरकार त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये गेले. त्यामुळे या सगळ्यांनी आपल्या अंतर्मनामध्ये शोध घेतला पाहिजे की, असे कसे झाले. पंधरा वर्षे असताना जे शक्य झाले नाही, ते आपण मुख्यमंत्री असतानाच का झाले, असे म्हणत भुजबळांनी चव्हाणांच्या डोक्यावरच सरकार जाण्याचे खापर फोडले. पुढे ते म्हणाले की,  आता पुन्हा जर एक चांगली बांधनी होत असेल तर त्यात पुन्हा वेगळे काही होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, असेही भुजबळ म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय का मागे घेतला? स्वत: केला खुलासा…

काय म्हणाले होते शरद पवार

चव्हाणांची पक्षात काय जागा आहे, ते आधी तपासावं, असा टोला पवार यांनी आज लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षात काय स्थान आहे. ते  आहेत, की बी आहेत, की सी आहेत, की डी आहे ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार, अशा शब्दात पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा समाचार घेतला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube