शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय का मागे घेतला? स्वत: केला खुलासा…

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय का मागे घेतला? स्वत: केला खुलासा…

Sharad Pawar retirement : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र दोन दिवसांनंतर शरद पवरांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. पण आपण हा राजीनामा मागे का घेतला? याच खुलासा शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार म्हणाले की मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक अस्वस्थ होते. पण त्यांच्या आग्रहास्तव मला माझे निर्णय बदलावे लागले. निर्णय बदलाचा म्हणजे त्यामध्ये एक गैरसमज होता. मी अध्यक्षपद सोडलं होतं पण पक्ष संघटनेच काम सोडलं नव्हतं. लोकांशी संपर्क करायाचा ठरवलं होतं. कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला, असे शरद पवार यांनी सांगितले.

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

ते पुढं म्हणाले की माझी अनेक वर्षे कामाची एक पद्धत आहे. कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल तर दोन ठिकाणावरुन करत असतो. एक सोलापूर आणि दुसरी कोल्हापूर येथून करतो. यावेळी सोलापूरपासून आपण सुरुवात करायची हे ठरलं म्हणून मी इथं आलोय. सोलापूर शहर सामान्य कार्यकर्त्यांना उर्जा देणारे शहर आहे. त्यामुळे इथल्या कार्याकर्त्यांना भेटून महाराष्ट्राचा दौरा सुरु करतो आहे. संबंध महाराष्ट्राच चित्र कसं बदलता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

लग्नाचा वाढदिवस…सेलिब्रेशन सुरु होतं अन् क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला

सोलापूरच्या लोकसभा जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला जाऊ शकतो. या मतदार संघात चार वेळा काँग्रेसचा पराभव झालेला आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा लढवण्याला नकार दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ह्या जागेवर दावा करु शकते. सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानंतर रात्री मुक्काम करुन ते सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्टरने निपाणीकडे रवाना झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube