जितेंद्र आव्हाडांनी वळसे पाटलाचं वयचं काढलं! म्हणाले, तेवढं वय..,

जितेंद्र आव्हाडांनी वळसे पाटलाचं वयचं काढलं! म्हणाले, तेवढं वय..,

शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीएवढं वयही नसलेल्या व्यक्तीचं बोलणं म्हणजे बालिशपणाच, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांवर(Dilip Walse Patil) बरसले आहेत. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत धुमशानच सुरु असल्याचं दिसून येत आहे. वळसे पाटलांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच थेट वयच काढलं आहे.

बारामतीत पवारांचे दोन्ही गट आमने-सामने? जयंत पाटलांनी सांगून टाकलं…

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांचं राजकारणातलं वजन कमी करण्यासाठीच सुपारी देण्यात आलीयं. वळसे पाटलांची टीका म्हणजे साहेबांची प्रतिमा खराब करण्याचा राष्ट्रीय प्लॅन आहे. साहेबांनी ज्यांना आमदार केलं मंत्रिपदं दिली ते आज त्यांच्या कर्तुत्वाविषयी बोलत असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

तुमची लायकी सरपंच निवडणुकीची, लोकसभा लढवायची खाज असेल तर…; राऊतांना राणेंचं आव्हान

तसेच शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीएवढं वयही नसलेल्या व्यक्तीकडून असं बोलणं म्हणजे बालिशपणाचं उत्तम उदाहरण आहे. पवारसाहेबांनी उभा केलेला पक्ष तुम्ही बळकवण्याचा प्रयत्न करत आहात, जर तुमच्यात धमक असेल तर स्वतःचा पक्ष तयार करून मैदानात या, असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. तुमच्यासारखी माणसं असल्याने पवारसाहेब स्वबळावर सत्ता आणू शकले नाहीत. तुमच्यासारखे सरदार असल्यामुळेच शरद पवार यांना एक हाती सत्ता आणता आली नसल्याचीही टीका आव्हाड यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, तुमच्यासारखे साहेबांसोबत असताना सुद्धा साहेबांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान मिळवले असून ते चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे.

Ahmednagar Crime : आठ मंदिरं लुटले, 31 गुन्हे दाखल, चोरट्यांची ‘ती’ टोळी अशी झाली गजाआड

काय म्हणाले होते वळसे पाटील?
देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या आहेत.

कांदा निर्यातीवर शुल्कवाढ म्हणजे शेतकऱ्यांना मारण्यासारखं :
कांद्याच्या निर्यातीवर 40% टॅक्स लावणे म्हणजे शेतकऱ्यांना मारण्यासारखे आहे. त्यावरील 40% टॅक्स लावण्याचे कारण देशातील सत्तारूढ पक्षाने राजकीय स्वार्थासाठी हा निर्णय घेतला आहे. देशातील सत्तारूढ पक्ष हा केवळ व्यापारांसाठी निर्णय घेत आहे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी रस्त्यावर आलं तरी या केंद्र सरकारला त्यात काहीही फरक पडत नाही. देशातील भाजप सरकार ही शेतकरी विरोधी सरकार आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube