‘थोडा वेळ जाऊ द्या, साहेब राजकीय..,’; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान
शरद पवार कधीही राजकीय भूकंप करु शकतात, याची अनेकांना प्रचिती आहेच, थोडा वेळ जाऊ द्या, पवारसाहेबांची भूमिका समजेलच, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजप प्रवक्त्याने घेतला भुजबळांचा समाचार; ब्राह्मण समाजातील शिवाजी अन् संभाजी नावांची दिली यादी
रोहित पवार म्हणाले, आमच्यासारख्या अनेकांवर भाजपकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. मला पण ईडीची नोटीस येऊ शकते पण तरीही मी शरद पवार साहेबांसोबतच राहणार आहे. कारण शरद पवार कधीही राजकीय भूकंप करु शकतात, याची अनेकांना प्रचिती आहेच, थोडा वेळ जाऊ द्या, पवारसाहेबांची भूमिका समजेलच असं रोहित पवार म्हणाले आहेत.
टोमॅटोने पोळलेल्या सरकारचा कांद्यावर आघात! चाळीस टक्के निर्यात शुल्क
तसेच भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवर भाष्य करीत नाही पण याचं मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, भाजप याच मूळ आहे. त्यामुळे भाजपविरोधात आम्ही लढत राहणार आहोत. आम्ही एकमेकाविरोधात बोलत रहावं, व्यस्त राहावं, हीच भाजपची मूळ रणनीती असल्याचं ते म्हणाले आहेत.
टीकाचं नाही तर, ‘उत्तर’ काय देणार; अजितदादा पेचात, बीडची सभा रद्द होणार?
शिवसेना फुटली तेव्हा बंडखोर नेत्यावर बोललं जात होतं. आता उध्दव ठाकरे भाजपच्या मुळावर बोलत आहेत. त्यामुळे भाजपच्या मूळाकडून लक्ष विचलित व्हावं हीच भाजपची रणनीती असल्याचं ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलतना त्यांनी पुण्यातल्या स्वाभिमान सभेवरही भाष्य केलं असून ते म्हणाले, बारामती जिल्हा नसून तालुका आहे. पुण्यात सभेचं ठिकाण आणि कधी घ्यायची हे शरद पवार ठरवत असतात, असंही ते म्हणाले आहेत. अजित पवारांसोबत गेलेले आमदारांमध्ये मत परिवर्तन होताना दिसत आहे. त्यांना घ्यायचं का नाही? याबाबत शरद पवार विचार करत असल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.