तुम्ही जेवण करुन घ्या, शरद पवारांची उपोषणकर्त्यांना विनंती

तुम्ही जेवण करुन घ्या, शरद पवारांची उपोषणकर्त्यांना विनंती

तुम्ही जेवण करुन घ्या, अशी विनंती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपोषणकर्त्यांना केली आहे. दरम्यान, शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणनेनंतर मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलं. यावेळी शरद पवारांनी उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे.

Sharad Pawar Retirement : पवार राजीनामा देणार ‘हे’ अजित पवारांना आधीच माहित होतं, म्हणाले…

कार्यकर्त्यांनी उपोषण करु नये, काहीतरी मार्ग काढू, या शब्दांत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढली आहे. सुळे आणि अजित पवारांच्या विनंतीला कार्यकर्त्यांनी फारसं महत्व दिलं नसल्याचं यावेळी दिसून आलं आहे.

अखेर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट शरद पवारांशी फोनद्वारे संवाद करुन उपोषणकर्त्यांनी बोलण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी शरद पवारांनीही कार्यकर्त्यांना उपोषण करु नका, मार्ग निघेल, तुम्ही जेवण करा, अशी विनंती केली आहे.

The Kerala Story वरून वाद; चित्रपटातील दावे सिद्ध करणाऱ्याला मुस्लिम संघटनेकडून 1 कोटीचे बक्षीस जाहीर

दरम्यान, फोनवर झालेल्या संवादानंतर सुप्रिया सुळेंनी पुन्हा कार्यकर्त्यांनी चहा, नाष्टा करावा, तोपर्यंत काहीतर मार्ग काढणार असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. एकंदरीत या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घ्यावा, असा पवित्रा घेतला आहे.

यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, दिलीप वळसे, विद्या चव्हाण, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असं आवाहन केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube