नीलम गोऱ्हेंकडून अजित पवारांना चिमटे; म्हणाल्या, एका खुर्चीवर एक…

नीलम गोऱ्हेंकडून अजित पवारांना चिमटे; म्हणाल्या, एका खुर्चीवर एक…

Nilam Gorhe Comment On Ajit Pawar CM Statement NCP Maharashtra politics CM Eknath Shind : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला. त्यनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला आताही 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार यांनी पुण्यात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकू शकते. यासाठी २०२४च्या निवडणुकांची वाट पाहण्याची गरज नाही. मला आताही 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं ते भाजपशी जवळीक साधून आहेत, या चर्चांना पुन्हा पेव फुटले आहे. नीलम गोऱ्हे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की, सध्या एका खुर्चीवर एक माणूस बसला असताना दुसरा माणूस कसा बसू शकतो, असं शब्दात अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर गोऱ्हे यांची चिमटा काढला.

Pune News : अश्लील रॅप साँगवरून वातावरण तापलं; ABVP कडून विद्यापीठात तोडफोड आंदोलन

त्या म्हणाल्या, अजित पवार हे सक्षम नेते आहेत, त्यांच्यकडे नेतृत्व करण्याची क्षमता देखील आहे. त्यामुळं आपण मुख्यमंत्री व्हावं, अशी त्यांना इच्छा असू शकते. त्यांनी सीएमपदाची इच्छा ठेवणं काही गुन्हा नाही. महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हाही त्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा होती. मात्र, त्यावेळेलाही त्यांनी उद्धव ठाकरे सोबत आनंदाने काम केलंच की… आता 2024 मध्ये त्यांनी सीएमपदाची आशा बाळागणं गैर नाही, असं सांगितलं.

त्या म्हणाल्या, सध्या माध्यमं आणि राजकीय नेते, कार्यकर्त्यांची परिस्थिती म्हणजे डोंगराला आग लागली पळा पळा अशी झाली आहे. कोण कुठल्या दिशेला पळतंय हेच समजेना झालं आहे. जिथं आपल्याला कामात समाधान आहे. वैचारिक बाधीलकी आहे, जिथं भविष्य आहे त्या ठिकाणी आपण काम करावं, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार हे भाजपसोबत जाणार आहेत, याचं सुतोवाच खा. संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळं राऊत हे अजित पवारांच्या नजरेत व्हिलन बनत आहेत का? असं विचारलं गोऱ्हे यांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, संजय राऊतांनी अजित पवार हा गोड माणूस आहे, अशा शब्दात पवारांचं कौतूक केलं. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झाल्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे. दांडगा अनुभव असल्यानं त्यांच्याकडे सीएम पद सांभाळण्याची क्षमता आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं राऊत म्हणाले होते. त्यामुळं अजित पवार- संजय राऊत यांच्यात कुठलेही वाद नाहीत.

दरम्यान, , एका खुर्चीवर एक माणूस बसला असताना दुसरा माणूस कसा बसू शकतो, असं शब्दात अजित पवारांना टोला मारणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना राष्ट्रवादी काय उत्तर देते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube