‘ऑपरेशन टायगर’ फत्ते ! एकनाथ शिंदे झाले आता अमित शाहांचे अतिलाडके
Omraje Nimbalkar- शेवटी रविवारी रात्री ओमराजे निंबाळकरांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर फत्ते झाले आहेत.
Omraje Nimbalkar join Shinde Sena : : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा एक राजकीय खेळी यशस्वी केलीय. चार वर्षांत दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंना धक्का देत आपली ताकद वाढविली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे शिंदेंचे ऑपरेशन टायगर रखडले होते. परंतु रविवारी ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मतदारसंघात जावून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिंदे यांचे ऑपरेशन टायगर फत्ते झाले आहे. विशेष म्हणजेच या ऑपरेशन मोहिमेसाठी गृहमंत्री अमित शाहांचे पाठबळ असल्याचे ठामपणे बोलले जात होते. हे ऑपरेशन टायगर यशस्वी करून एकनाथ शिंदे हे अमित शाहांचे अतिलाडके झाल्याची चर्चा राजकारणात सुरू झालीय.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची राजकीय चर्चा होती. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे दोन-तृतियांश खासदार फोडणार असे बोलले जात होते. हे एकनाथ शिंदे यांनी खरे करून दाखविले आहे. वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे
नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ओमराजें निंबाळकरांमुळे ऑपरेशन टायगर रखडले होते.
ओमराजे निंबाळकरांमुळे ऑपरेशन राखडले होते
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याबाबत ओमराजे निंबाळकर संदिग्ध होते. त्यामुळे ऑपरेशन टायगर रखडले होते. त्यात वडिल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकालविरोधात गेला होता. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे शिंदेंबरोबर जाणार नाही, अशी राजकीय चर्चा होती. शनिवारी रात्री आमदार कैलास पाटील, आमदार वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची पुण्यात भेट घेतली होती. ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेसेना सोडू नये, अशी त्यांना गळ घातली जात होती. मतदारसंघात जावून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ओमराजे निंबाळकरांनी जाहीर केली होती. शेवटी रविवारी रात्री ओमराजे निंबाळकरांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर फत्ते झाले आहेत.
तानाजी सावंताने ओमराजेंना मनावले ?
आमदार तानाजी सावंत ओमराजेंच्या भेटीसाठी गेले होते. ओमराजे निंबाळकर यांची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर दिल्याची चर्चा होती. त्यानुसार तानाजी सावंत यांनी ओमराजेंना शिंदेसेनेत जाण्यासाठी मनावले आहे.
एकनाथ शिंदेंची ताकद वाढली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सात खासदार होते. तर भाजपकडे राज्यात आठ खासदार आहेत. आता ऑपरेशन टायगरमध्ये शिंदे यांच्याकडे तेरा खासदार आहेत. खासदारांचा विचार केल्यास एकनाथ शिंदेंकडे राज्यात भाजपपेक्षा जास्त खासदार झाले आहेत. त्यामुळे आता राजकीय ताकद वाढलेली आहेत. तर केंद्रात एनडीएमध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष भाजप, टीडीपीनंतर सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. एनडीएमध्ये भाजपकडे 240 खासदार आहेत. टीडीपीकडे 16 खासदार आहेत. त्यानंतर शिवसेनेचे तेरा खासदार आहेत. त्यामुळे केंद्रातही शिंदेंचे वजन वाढले आहेत.
अमित शाह आणि एकनाथ शिंदे
गेल्या चार वर्षांत गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे. कारण अमित शाहांचे पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी यशस्वी राजकीय खेळ्या केल्या आहेत. 2022 चे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना फोडण्याचा बंडामागे अमित शाहाचे होते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकले. महत्त्वाच्या राजकीय निर्णयांपूर्वी शिंदे आणि शाह यांच्यात थेट चर्चा होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या ऑपरेशन टायगरमध्येही एकनाथ शिंदे हे यशस्वी झालेले आहेत. तसेच अमित शाह यांनी सार्वजनिक सभांमधून अनेकदा शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला आहे. कालच कोल्हापूरमध्ये अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांचे तौंडभरून कौतुक केले होते. एकच शिवसेना आहे आणि ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे, असे अमित शाह यांनी विधान केलेले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे राजकीय तडजोडीसाठी थेट अमित शाहांचे संपर्कात राहतात. त्यामुळे स्थानिक भाजपबरोबर एकनाथ शिंदे फारशी चर्चा करत नाहीत, असे बोलले जात आहे.