…तर संजय राऊत अजितदादांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, भाजप खासदारांचा गौप्यस्फोट

  • Written By: Published:
…तर संजय राऊत अजितदादांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, भाजप खासदारांचा गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागेल, असं वाटत होत पण तसं घडताना मात्र दिसत नाही. त्यानंतरही अजित पवार आणि राष्ट्रवादीबद्दल अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत.

त्यातच आता भाजपच्या एका खासदाराने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत अजित पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, असा दावा भाजप खासद अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Chandrashekhar Bavankule : मविआचेच नेते अजित दादांना बदनाम करतात, बावनकुळेंचा आरोप

गेल्या काही दिवसापासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल बोंडे म्हणाले की, “संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढतील. शिवसेनेतील 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून गेले. अजितदादा पवार हे सुद्धा संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडून जातील.” असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

आघाडी फुटण्यास संजय राऊतच जबाबदार

यावेळी अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले की, महाविकास आघाडी फुटण्यास संजय राऊतच जबाबदार राहतील. तशी त्यांची थोरवी मोठी आहे. शिवसेना फोडण्यातही त्यांचाच मोठा वाटा आहे. राऊतांनीच 40 आमदारांना घराच्या बाहेर काढलं.

कोण संजय राऊत?

दरम्यान आज पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक उत्तर दिल. प्रश्नांला उत्तर देताना अजितदादांनी ‘कोण संजय राऊत’ असा उलट प्रश्न पत्रकारांना केला.

…तेव्हा चंद्रकांत पाटलांनी हात वर केले, आज त्याच हाताने गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिला पक्षात प्रवेश

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत टीका केली होती.

अजितदादांच्या त्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तरही दिले होते. संजय राऊत म्हणाले की, गेली 45 वर्ष झाली मी पत्रकारीतेत आहे. त्यामुळे मला माहिती आहे काय लिहियाचे? काय कोट करायचे? शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे अशा सगळ्या नेत्यांना मी कोट करतो. मी बरोबर बोललो, बरोबर लिहिले आहे. मी कधीही माझ्या विधानापासून माघार घेतली नाही. मी काय चुकीचे बोललो ते त्यांच्या पक्षाकडून कोणीतरी येऊन सांगावं. अजितदादांनी सिध्द करावं मी काय चुकीचे बोललो. पवारसाहेबांशी यावर चर्चा करावी, असे अवाहन संजय राऊत यांनी अजित पवार यांना केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube