‘जो निर्णय घ्यायचा तो जनता घेईल’, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते Rajan Patil यांचे उत्तर

‘जो निर्णय घ्यायचा तो जनता घेईल’, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते Rajan Patil  यांचे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील ( Rajan Patil ) यांच्या सोलापूरच्या निवासस्थानी गोवा राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी भेट दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राजन पाटील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आहेत. सावंतांच्या या भेटीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

(असाही योगायोग, २२ फेब्रुवारी : शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवेशाची तारीख)

माझ्या मुलांचे मित्र व सावंत यांचे मित्र हे एक असल्यामुळे सावंत यांनी आमच्या घरी  भेट दिली होती. ही पुर्णपणे कौटुंबिक भेट होती, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा चर्चांवर देखील त्यांनी भाष्य केले. निर्णय घेणारा मी कोण?, जो काही निर्णय घ्यायचा  तो जनता घेईल. या जनतेने 50 वर्षे माझ्या वडिलांचे व माझे नेतृत्व मान्य केलेले आहे. त्यामुळे मी  फक्त पोस्टमन प्रमाणे सावंत यांचा निरोप जनतेपर्यंत पोहोचवेल. जनता जो निर्णय देईल तो मला मान्य असेल, असे राजन पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी भाजपचे खासदार धनंजय महाडिक व राजन पाटील या दोघांच्या पॅनेलमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी निवडणूक झाली होती. या प्रचारात राजन पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरुन पाटील यांच्यावर बरीच टीका देखील झाली होती. पाटील यांचा या साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube