लवकरच देशात मोठा राजकीय भूकंप, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा…
येत्या 19 डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होणार असून भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलायं.
Pruthviraj Chavan येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असून भारताचा पंतप्रधान मराठी माणूस होणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी केलंय. पुढील पंतप्रधान हा मराठी माणूस असून भाजपचाच असणार असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर त्यांनी हा दावा केलायं. त्यांच्या या दाव्यामुळे सध्या एकच चर्चा रंगलीयं.
Video : बार्टी अन् सारथीच्या PHD प्रवेश संख्येवर मर्यादा घालणार; अजितदादांची सभागृहात माहिती
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, अमेरिकेतील एका इस्त्राईलच्या गुप्तहेराने दिग्गजांच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले आहे. या स्टिंग ऑपरेशनचा लवकरच पर्दाफाश होणार असून लवकरच अमेरिकेत धुमाकूळ होणार आहे. अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतातही उमटणार असल्याचाही दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मागील सहा महिन्यांपासून एपस्टाईन फाईल्समुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटू शकतात. जेफ्री एपस्टाईन या अमेरिकन उद्योगपतीने अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग घेतला होता आणि विविध देशांतील काही प्रभावशाली नेत्यांची नावे त्यात समोर आली.
विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्री नायडू काय म्हणाले?, इंडिगोवर थेट भाष्य
या यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख असल्याचे दिसते. अमेरिकन संसदेने या प्रकरणाचा सातत्याने मागोवा घेत असून सुमारे दहा हजार कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. ती माहिती सार्वजनिक झाली तर ट्रम्प यांना पदाचा राजीनामा देण्याच्या स्थितीत जावे लागू शकते, असंही ते म्हणाले आहेत.
