पाथर्डीतून पंकजा मुंडे उभ्या राहिल्या तर ? ढाकणेंनी दिले ‘हे’ उत्तर
Pratap Dhakane On Pankaja Munde:
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. स्वतः पंकजा मुंडे यांनी पाथर्डीसह राज्यातील इतर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बोलून दाखविले आहे. याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोनिका राजळे यांना जोरदार लढत देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ढाकणे (Pratap dhakane) यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला आहे.
Sayali Sanjeev: ठरलं! नाशिकची भावी आमदार, खासदार होण्यास सायली संजीव तयार?
पंकजा मुंडे यांच्या पाथर्डीतील उमेदवारीबाबत ढाकणे म्हणाले, पाथर्डीतून विधानसभा लढविणे त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. मी मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी जनतेत जात आहे. त्यांचे प्रश्न सोडवत आहे. कोणाला उमेदवारी द्यायची हा ज्या, त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे आताच विधानसभेचा विचार करत नाही.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणुका आधी आहेत. या निवडणुकीत पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी पक्षाचे अजित पवार व इतर नेते पाथर्डीत आले. त्यांच्यामार्फत पाथर्डीचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहे.
सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका
निवडणुकीचा विचार केला तर कार्यकर्त्यांसाठी सातत्याने संपर्कात रहावे लागते. निवडणूक लढविण्यासाठी कधी पण सज्जा रहावे लागते, असे ढाकणे म्हणाले.
सध्या जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाथर्डी बाजार समितीची निवडणूक आहे. प्रताप ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांचा पॅनल आमने-सामने येणार आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीबाबत ढाकणे म्हणाले, आमचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. 2017 मध्ये बाजार समिती माझ्या ताब्यात आली. त्यावेळी बाजार समिती तोट्यात होती. बाजार समितीतील चोरवाटा बंद केल्या. त्यामुळे तोटा कमी होऊन आता बाजार समिती 51 लाखांचा नफा मिळविला आहे.