Pravin Darekar : ठाकरेंची वैफल्यग्रस्त विधानं म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड
Pravin Darekar on Udhav Thackery : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर रविवारी नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे.
रविवारच्या या सभेमध्ये देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका केली. यावर आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ही वज्रमूठ सभा नव्हती तर महाविकास आघाडीत लागलेी सफेद झूठ बोलण्याची स्पर्धा लागली होती. तर यामध्ये उद्धव ठाकरे जे काही बोलले ते म्हणजे वैफल्यग्रस्त विधाने होती एखादा दिवा विझताना जसा फडफड करतो तशी ती वक्तव्ये होती. त्यांची ही टीका नेहमी प्रमाणे केली जाणारी आग पाखड होती. मोहन भागवतांवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
“Amit Shah यांच्या वेळेमुळेच दुपारी कार्यक्रम; व्हीआयपी छपराखाली आणि…” संजय राऊत यांचा हल्लाबोल
केवळ भाजप, मोदी आणि केंद्र सरकारला शिव्यांची लाखेली वाहायची हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी चालवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत असे ते बोलले होते. थापा लावायचे काम ते करत आहेत. या उलट आमच्या सरकारने भुविकास बँकेचे ७०० ते ८०० कोटी कर्ज माफ केले आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातून बालिशपणा दिसून आला आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी असा आरोप उद्धव ठाकरेंवर केला आहे.
नागपूर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशात गॅस सिलिंडर, पेट्रोलचे भाव किती होते. आता किती झाले आहे. महागाई परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. पण, त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना धार्मिक बनवले जात आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच घरचा आहेर दिला आहे. आता काय बोलणार आहे, देशातील जनतेला काय उत्तर देणार आहे, अशी सडकून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.