जे घडलं त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज; पंतप्रधानांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी केली चर्चा

पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जे घडलं, त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज आहे. आपल्या समाजात हे निंदनीय आहे.

Modigavai

सुप्रीम कोर्टात घडलेल्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई (CJ B.R. Gavai) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. एका वकिलाने सुनावणीदरम्यान कोर्टात गोंधळ घातला आणि मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जे घडलं, त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना जागा नाही. ही घटना अतिशय खेदजनक आहे. सरन्यायाधीशांच्या धैर्याचे कौतुक पंतप्रधानांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शांततेचे आणि संयमाचे कौतुक केले. अशा परिस्थितीत गवई यांनी दाखवलेले संयम आणि धैर्य न्यायव्यवस्थेच्या मूल्यांबद्दलची त्यांची निष्ठा दाखवते.

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई! राकेश किशोर यांची प्रॅक्टिस स्थगित

हे आपल्या संविधानाच्या भावनेला अधिक बळकट करणारे आहे असं पंतप्रधान म्हणाले. ही घटना सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान घडली. वकील राकेश किशोर याने कोर्टात गोंधळ घातला आणि ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही’ अशी घोषणा दिली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या वकिलाला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी डीसीपी कार्यालयात नेले. घटनेनंतर CJI गवई म्हणाले, अशा कृतींनी आम्ही प्रभावित होत नाही.

न्यायालयाचे कामकाज सुरूच राहील”. या गोंधळानंतरही त्यांनी सुनावणी थांबवली नाही आणि कोर्टातील शिस्त कायम ठेवली. या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन ने तीव्र निषेध नोंदवला. संघटनेने म्हटलं, एका वकिलाच्या वर्तनामुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आणि मुख्य न्यायाधीशांच्या पदाचा अपमान झाला आहे.

follow us