राज्यातील सरकार मविआमध्ये फूट पाडतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

  • Written By: Published:
राज्यातील सरकार मविआमध्ये फूट पाडतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Prithviraj Chavan On Shinde – Fadanvis : सध्या राज्यात अजित पवार यांच्या भूमिकेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याबाबत बोलताना म्हणतात कि अजित पवार खरंच अमित शहा यांना भेटले का? ते अजित पवारांनाच विचारलं पाहिजे. खरच भेटले का हे सांगणार कुणी आहे का ? बघावं लागले. परंतु अशा चुकीच्या बातम्या पसरून शिंदे – फडणवीस सरकार महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करत आहे.

या शिंदे – फडणवीस सरकारने आणि केंद्र सरकारने कितीही महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न केला तरी ते यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. कारण महाराष्ट्रातील जनता सगळं जाणते. त्यांना माहित आहेत कि महाराष्ट्रासाठी कोण योग्य आहे. आणि कोण नाही ते त्यामुळे यांनी असा प्रयत्न करू नाही.

Ajit Pawar : माझ्यावर एवढं काय प्रेम उतू चाललंय… 

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या काळातील महत्वाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू असलेले मंत्री त्यांची मुलाखत दाखवली नाही. मोदी जवाब दो या चौकशीच काय झालं आहे का ? ते तुम्ही करताय का? आणि मोदींची जी मुलाखत त्या विदेशी डॉक्युमेंटरी करतात भारताचे पंतप्रधान हे कुठल्याही कम्युनिकेशन शिवाय कुठेतरी गेले होते.

‘मला या विषयावर बोलायचं नाही’ ; शरद पवारांनी ‘त्या’ घटनेवर बोलणेच टाळले

राज्यपालाचा नंबर होता का नरेंद्र मोदींना सगळ्या राज्यपालाच्या नंबर पाठ आहे का? नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कशाप्रकारे बघता? भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एका नेत्यांना भूमिका घेतली. आजही भारतीय जनता पक्षाची ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भूमिका घेतलेली आहे. इतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भूमिका घेणार आहेत का? असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube