Ajit Pawar : माझ्यावर एवढं काय प्रेम उतू चाललंय…
अखेर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विरोधकांच्या टीका, आरोपांवर स्पष्ट बोलले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार म्हणाले माझ्यावर एवढं काय प्रेम उतू चाललंय, मला तेच कळत नाही असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
Atiq Ahmed Murder : अशी झाली अतिक अन् अशरफची हत्या…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्याबद्दल भाजप नेत्यांसह शिंदे गटाच्या आमदारांकडून अजित पवारांवर भाष्य केलं जातंय. यामध्ये विशेषत: मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाब पाटील या सर्वच नेत्यांचं माझ्याबद्दल एवढं काय प्रेम उतू चाललंय, असा सवाल उपस्थित केला आहे.
आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडणार आहे. आजच्या सभेत महाविकास आघाडीची भूमिका आम्ही ठरल्यानूसार स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच महाविकास आघाडीच्या सभेसंदर्भात सत्तेत असतानाच ठरलं होतं. त्याचंवेळी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला होता.
भाजपच्या भीतीने हे तिन्ही पक्ष एकत्र; चंद्रकांतदादांचा मविआवर हल्लाबोल
महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोमिलन आणि समन्वय साधण्यासाठी आम्ही सभा घेत असून जोपर्यंत त्यांची एकजूट होणार नाही तोपर्यंत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाता येणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. त्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवरील नेत्यांची मोट बांधण्याचं काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मी कुठं विरोधकांना सांगतोय, की माझ्याविषयी चर्चा करा, असंही ते म्हणाले आहेत. उगाच कारण नसताना गैरसमज पसरु नका, माझ्याबाबत जे काही बोलतात ते बिनबुडाचं असल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सत्तासंघर्षावरही आपलं भाष्य केलं आहे.
Karnataka Election : येदियुरप्पांच्या नातवाचाच भाजपला राम राम, ‘या’ पक्षाच्या तिकिटावर लढणार निवडणूक
पवार म्हणाले, अद्याप सर्वोच्च न्यायालयाचं निकाल येणं बाकी आहे. भाजपकडे एकूण आमदार 115 आहेत. तर शिंदे गटाकडे 40 आमदारांचं संख्याबळ आहे. तसेच इतर 8 ते 10 जण आमदार असतील, एकूण मिळून भाजपकडे 165 आमदार आहेत. 16 आमदार अपात्र झाले तर त्यांचा आकडा 149 आकडा राहतो. तर महाविकास आघाडीकडे 145 आमदार आहेत. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरले तरी 149 राहते.
त्यामुळे एकूण विधानसभेच्या 288 जागांमधून 16 आमदार अपात्र ठरले तर विधानसभेच्या 272 जागा शिल्लक राहतात. त्यामुळे आता बहुमत किती जागांना राहणार हे तुम्हीच ठरवा, असंही मनमोकळेपणाने त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, विरोधकांनी वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, शंकाकुशंका निर्माण करण्याचं काही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलंय.