Atiq Ahmed Murder : अशी झाली अतिक अन् अशरफची हत्या…
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे माजी खासदार आणि माफिया गुंड अतिक अहमद (AtiQ Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि भाऊ अशरफच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झाल्याने खळबळ माजलीय.
Atiq Ahmed चे मारेकरी म्हणाले, मर भी जाते तो कोई गम नहीं…
काल रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. अतिक आणि भाऊ अशरफचे हात हातकड्यांनी बांधलेले होते. याचदरम्यान, अतिक अहमद भाऊ अशरफ बोलत असतानाच अचानक गोळीबार झाला. यामध्ये अतिक आणि अशरफ या दोघांचीही निर्घूण हत्या झाली.
अतिक अहमदच्या हत्येसाठी वापरलेल्या बाईकबाबत मोठा खुलासा, काय होता प्लॅन?
दोघांच्या हत्येचा व्हिडिओ माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून एक पत्रकार अतिक अहमदला प्रश्न विचारत होते. त्याचंवेळी कॅमेऱ्यासमोर बंदुक ताणलेला व्यक्ती समोर येत अन् अतिक, अशरफ यांच्यावर गोळी झाडतो. गोळीबारानंतर अतिक आणि अशरफ दोघेही जमीनीवर खाली पडल्यानंतरही त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये कैद झाल्याची माहिती मिळत आहे.
ब्रेकिंग न्यूज : गँगस्टर अतिक अहमद आणि भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या
गोळीबारानंतर काही काळ तणावाची परिस्थित निर्माण झाली होती. त्याचवेळी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना पकडलं असल्याची माहिती अतिक अहमदच्या वकिलाने सांगितलं. तर गोळीबार करणाऱ्यांनी आत्मसमर्पण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालणार का?; कांजूरमार्ग कारशेडवरून आदित्य आक्रमक
हल्लेखोरांची माहिती गुलदस्त्यात :
घटनेप्रकरणी पोलिसांकडून एकूण तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून अद्याप त्यांची माहिती घोषित करण्यात आलेली नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी केली जात आहे. चौकशी केल्यानंरत अधिकृतपणे त्यांची माहिती दिली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर तत्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली असून योगी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर त्यासाठी तीन न्यायालयीन सदस्यांच्या आयोगाची स्थापना करण्याती आलीय.