Radhakrishna Vikhe Patil : पोपटवाल्या भविष्यवाल्यांची उपासमार करु नका, विखे पाटलांचा पवारांना टोला
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना टोला लगावला आहे. पोपटवाल्या भविष्यकारांची उपासमार करु नका, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. पवारांनी देशात बदलाचे वारे वाहायला लागले आहेत, असे विधान केले होते.
विरोधकांनी आता स्वप्नरंजन करण्याचे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक भविष्यकार झाले होते. त्यांनी आता भविष्य सांगणे बंद करावे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जे पोपटवाले भविष्य सांगण्यासाठी बसत होते, त्यांची तुम्ही उपासमार का करता, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. त्यांना त्यांचे काम करु द्या. सध्या कोणतेही बदलाचे वारे नाही आहेत. जनतेच्या मनात देखील कोणताही बदल करण्याची इच्छा नाही, असे विखे पाटील म्हणाले आहेत.
Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना राज्यात व देशात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत, असे वक्तव्य केले होते. कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाला यावरुन राज्यात आता बदलाचे वारे जाणवत आहेत. भाजपने काँग्रेसचे राज्य होते त्याठिकाणी आमदार व खासदार फोडून त्याठिकाणी आपले राज्य आणले आहे, अशी टीक पवारांनी केली होती. त्याला विखे पाटलांनी आता उत्तर दिले आहे.
दरम्यान कसब्याच्या जागेसाठी खुद्द शरद पवारांनी देखील प्रचार केला होता. यासाठी त्यांनी काही ठिकाणी बैठका घेत भाषण केले होते. त्यांच्या एका सभेत काँग्रेसच्या नेत्याने मतदानासाठी दुबईवरुन लोक आणा असे म्हटले होते. यावरुन बराच वाद झाला होता. परंतु कसबा मतदारसंघ आता काँग्रेसकडे आल्याने महाविकास आघाडीमध्ये जोश संचारला आहे.