कोर्लई येथील १९ बंगले घोटाळा प्रकरण; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल

कोर्लई येथील १९ बंगले घोटाळा प्रकरण; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल

मुंबई : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागणार आहे, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात (bungalow scam case) आता ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, FIR मध्ये ठाकरे कुटुंबीयांचे नाव नसल्याचे पुढे आले आहे.

कोर्लईतील 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल झाला आहे. ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवली आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल रात्री रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 26, IPC Sections 420, 465, 466, 468 आणि 34 नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला.

Kasba By Election : अक्षय गोडसेंचं स्पष्टीकरण, म्हणाले माझ्याकडे धंगेकरांचा नंबर सुद्धा नाही…

मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्‍यांविरुद्ध फसवणूक, संगनमत केल्याने 19 बंगल्याच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, अशी तक्रार रेवदंडा पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंदवण्यात आली. अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube