उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटणार, महाराष्ट्रावर अन्यायच होणार; राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray : महाराष्ट्रात वीजप्रकल्प येतात ते केंद्राकडून येतात. राज्य सरकार ब्र ही काढू शकत नाही. हे सर्व कुठ जाणार आहे
Raj Thackeray On Delimitation Bill : लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची फेररचना होणार असून, तब्बल 50 टक्के जागा वाढणार आहे. डिलिमिटेशन बील मंजूर (Delimitation Bill) करण्यासाठी भाजपने संख्याबळ जमा केले आहे. या बिलावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.
लोकसभेच्या जागा वाढल्यानंतर भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. उत्तरेतील राज्यातील खासदारांची संख्या वाढणार आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा या सर्व राज्यांवर भविष्यात अन्याय होणार आहे. हा अन्याय जास्त प्रमाणात होणार आहे. महाराष्ट्र हे दक्षिण राज्यातील आहे. दक्षिण शब्दाला मोगल दख्खन म्हणायच. त्याला इंग्रजनंतर डेक्कन म्हणायला लागले आहे. दक्षिणेच्या राज्यावर सर्वात मोठा अन्याय असणार आहे. केंद्रावरती राज्य अंवलबून ठेवण्यासाठी हा सगळा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केलाय.
शरद पवार धोकायंत्र-राज ठाकरे
होकायंत्र दिशा दाखवतो. पण शरद पवार हे धोकायंत्र आहे. अजित पवार ज्यावेळेस भाजपबरोबर गेले, तेव्हा मी ट्विट केले होते. एक टीम रवाना झाली आहे. दुसरी लवकरच रवाना होणार आहे. त्याप्रमाणे झाले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 232 जागा महायुतीला मिळाल्या होत्या. पण महाराष्ट्रात सन्नाटा होता, जल्लोष दिसला नाही. चोऱ्या माऱ्या करून मिळालेली सत्ता आहे. ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे. आम्हाला मंत मिळतायत पण आमची मतं कापली जातात. निवडणूक आयोगावर माझा विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात वीजप्रकल्प येतात ते केंद्राकडून येतात. राज्य सरकार ब्र ही काढू शकत नाही. हे सर्व कुठ जाणार आहे हे आपल्याला समजते. एकदा हाताबाहेर गेल्यानंतर परत रिव्हर्स गेअर टाकणे अवघड आहे, असा धोकाही राज ठाकरे यांनी मांडला आहे.