अजित पवार मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं विधान

  • Written By: Published:
अजित पवार मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं विधान

Rajendra Shingane On Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपशी (BJP) हातमिळवणी केल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यभरात त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. राष्ट्रवादीचे नेतेही अजितदादाच मुख्यमंत्री होणार असल्याचं बोलत आहेत. मात्र, शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहणाार असं सांगितलं. दरम्यान, त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी भाष्य केलं. अजित पवार मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं विधान केलं.

World Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध गिल करणार पुनरागमन? कर्णधार रोहित शर्माने दिली गुड न्यूज 

अजित पवारांच कट्टर समर्थक असेलेल आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना अजित दादा मुख्यमंत्री होतील का, असा सवाल केला. त्यावर बोलतांना शिंगणे म्हणाले, अजित पवार हे भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच. एक दिवस ते मुख्यमंत्री होतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ते कधी आणि कसे मुख्यमंत्री होतील, हे आत्ताच सांगता येणार नाही, असं शिंगणे म्हणाले.

ते म्हणाल, अजित पवार नेहमी सांगतात की, मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ चा जादुई आकडा गाठावा लागतो. एखाद्या पक्षाचे 145 आमदार निवडून आले नाहीत, तोवर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हे सुद्धा तितकचं मोठं सत्य आहे. पण, अजित पवार हे त्यांच्या कर्तृत्वाने 145 आमदार निवडून आणतील, याबाबत माझ्या मनात बिलकून शंका नाही, असं शिंगणे म्हणाले.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 40 हून अधिक आमदारांना सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला. त्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाशी हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला. अजित पवार गेल्या साडेतीन महिन्यांपासून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. ते महायुतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

दरम्यान, अजित पवारही मुख्यमंत्री होण्यासाठी नेहमीच तयार असतात. मात्र, त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळं ते वेट अॅंड वाचच्या भूमिकेत आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळेंनी काल फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं विधान केलं. त्यामुळं अजित पवार काय भूमिका घेतात, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube