युती धोक्यात? मुख्यमंत्री शिंदे आणि आंबेडकर यांच्यात गुप्त बैठक
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्या. आगामी निवडणुकासाठी ते एकत्र येणार अशा चर्चा सुरु असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक गुप्त बैठक झाली आहे. याबैठकीमुळे युती धोक्यात तर नाहीना अशा चर्चांना उधाण आले आहे.
अधिक माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली असेल हे अद्याप तरी समोर आले नाही. मात्र या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीसाठी चर्चा करत असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे अशातच मुख्यमंत्र्यांसोबतची ही बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आंबेडकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देखील प्रकाश आंबेडकर यांनाही ऑफर देण्यात आली होती. काही अटीशर्ती यांच्याबद्दल ही बैठक झाली आहे का? एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांना आपल्याकडे वळवून घेणार का? युतीला धक्का देत आंबडेकर शिंदे यांच्यासोबत जाणार का ? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. meets cm