हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार, राम सातपुतेंचा प्राजक्त तनपुरेंना इशारा

हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार, राम सातपुतेंचा प्राजक्त तनपुरेंना इशारा

तनपुरेंनी मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राम सातपुते यांनी दिलाय.

अहमदनगरमधील ब्राम्हणी धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात आली. धर्मांतर प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दराडे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मोर्चा काढून दराडे यांना पाठिंबा दर्शवला होता. दराडे यांनी अनेक गुन्ह्यांचे तपासही अल्पावधीत पूर्ण केले होते. असे असतानाही कथित प्रकरणांवरून कोणतीही चौकशी न करता शासनाने त्यांची बदली केली.

हे योग्य नाही. या बदलीच्या निषेधार्थ राहुरी येथे रस्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले, असं ट्विट आमदार तनपुरेंनी केलं. विशेषतः महिलांनी त्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरूण मुलींच्या छेडछाडीचे प्रकार कमी करण्यासाठी त्यांनी प्रभावी मोहिम राबवलेली असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

दरम्यान, एकंदरीत या संपूर्ण प्रकरणानंतर आता तनपुरे मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवेल. असल्या भाड्याने आणलेल्या गर्दीला हे सरकार भीक घालणार नाही. तनपुरे = हिंदूविरोधी, असं ट्विट भाजपचे आमदार राम सातपुते यांनी केलंय.

राहुरीकर एका चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. या जनक्षोभाची शासनाने दखल घेऊन प्रताप दराडे यांची करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी केलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube