अजितदादांनंतर मुख्यमंत्र्यांचेही लाडके झालेत, तटकरेंकडे कोणतं लिंबू? रामदास कदमांचा हल्लाबोल
Ramdas Kadam on Sunil Tatkare रामदास कदम यांनी अनिकेत तटकरेंची आमदारकी, आदिती तटकरेंचं पालकमंत्रीपद यावरून तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Ramdas Kadam on Sunil Tatkare for Legislative Council Election : रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीत हा संघर्ष टळल्याचे दिसून आले. कारण कोकण विधानपरिषद मतदारसंघात तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून गेले आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी तटकरेंबाबत मवाळ भूमिका घेतल्याची राजकीय चर्चा होती. परंतु शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी अनिकेत तटकरेंची आमदारकी, आदिती तटकरेंचं पालकमंत्रीपद यावरून तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास कदम?
खूप आभ्यास केला तरी तटकरेंकडे कोणतं लिंबू आहे कळत नाही? याचं उत्तर काही मिळत नाही. यामागे अशोक खरातही असू शकतो. पण 65 मतं असलेल्या माणसाचा मुलगा आमदार होतो आणि 350 मतं असलेल्या माणसांना तिकीट मिळत नाही.
दुसरीकडे तटकरेंच्या मुलीपेक्षा गोगावले जेष्ठ आहेत, पण गोगावलेंना पालकमंत्रीपद नाही. तरी जिल्हा नियोजनाच्या बैठकीला गोगावलेंना तिच्या पुढे बसावं लागत त्यामुळे मला कळत नाही की, तटकरेकडे काय जादू आहे. तटकरेंना आम्हीच निवडून दिलं. खरेतर तटकरे कुणाचेच होऊ शकत नाही. ज्या अंतुलेंनी तटकरेंना मोठं केलं. त्याला पाडण्याचं काम देखील तटकरेंनीच केलं.
दुसरीकडे आम्ही एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे तरटकरेंमध्ये असं काय आहे ते कळत नाही. कारण कालपर्यंत ते अजितदादांचा लाडके होते. आता मुख्यमंत्र्यांचे झाले आहेत. मात्र हे शिवसेनेसाठी घातक आहे.
मुंढेंचा मोर्चा औषधांकडे! रूग्णालयांच्या फार्मसीतून औषधं घेण्याचं बंधन केल्यास कडक कारवाई
त्याचबरोबर पुढे बोलताना कदमांनी बाळ मानेंवरही बोलले आहे. ते म्हणाले की, बाळ मानेंची माघार म्हणजे त्याच्यासोबत भास्कर जाधवही मॅनेज झाले का? उद्धव ठाकरेही मॅनेज झाले का? हा निर्णय मातोश्रीचा होता का? असं म्हणत रामदास कदमांनी थेट हल्लाबोल केला आहे.