गटार, पाठीत खंजीर खुपसणारे; रामदास कदम व सुनील तटकरे आमने-सामने का आले ?

Ramdas Kadam VS Sunil Tatkare: शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उडी घेतलीय.कदम आणि तटकरे यांनी थेट एकमेंकाविरुद्ध जहरी शब्द वापरले आहेत.

  • Written By: Published:
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare

Ramdas Kadam VS Sunil Tatkare: कोकणात महायुतीमधील नेत्यांमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आलाय. आता शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare) हे दोघे आमने-सामने आले आहेत. रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, मंत्री भरत गोगावले व तटकरे यांच्यामध्ये संघर्ष टोकाला जातो. थेट पक्षांच्या प्रमुखांना लक्ष घालावे लागते. आता यात थेट शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उडी घेतलीय.कदम आणि तटकरे यांनी थेट एकमेंकाविरुद्ध जहरी शब्द वापरले आहेत.

रामदास कदम यांनी मंडणगड येथे सुनील तटकरेंवर जोरदार निशाणा साधला. तटकरे यांच्या बाबतीत काहीही होऊ शकते, ते कुणाच्याही कायमचे होऊ शकत नाहीत. सुनील तटकरे जिथे जेवेल तिथेच छेद करेल, ही तटकरेची अवलाद आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे असे लागणारी शब्द रामदास कदमांनी वापरले. त्यावर सुनील तटकरे यांनी रामदास कदमांवर जोरदार निशाणा साधला. पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो. एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावे, आधीच मर्कट त्यात दारु प्यायले, असा पलटवार तटकरे यांनी केला. तसेच गटारात दगड टाकून अंगावर घाण उडवून घेत नाही, असे तटकरे म्हणाले.


रामदास कदमांना जुने हिशोब काढले

सुनील तटकरे यांच्या गटार शब्दावरून रामदास कदम हे प्रचंड चिडले आहे. सुनील तटकरे यांना गटारातून दगड मारून पाणी उडवून घ्यायचे नव्हते. तर माझ्या घरात का दहा वेळा आला ? तेव्हा गटाराची आठवण झाली नाही का ? असा सवाल कदमांनी केला. आम्ही लोकसभेला तटकरे यांना मदत केली. शिवसेनेच्या मतदार हे घड्याळाला मत देत नाहीत. परंतु आम्ही दापोली मतदारसंघातून 80 हजार मते मिळून दिली. उलट मुलाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तटकरेंनी गद्दारी केली, ते पाठीत खंजीर खुपसणारे आहेत, असा आरोप रामदास कदमांनी केला.


रामदास कदम-सुनील तटकरे आमने-सामने का आले ?

रामदास कदम-सुनील तटकरे यांच्या वाद उफाळण्याची कारण आहे एक पाणी योजना आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे 41 कोटींच्या नळपाणी योजनेवरून श्रेय घेण्यावरून हे नेते आमने-सामने आले आहेत. या पाणी योजनेसाठी मंत्री योगेश कदम यांनी प्रयत्न केले आहेत. आरोग्य खात्याची जागा मिळून तिथे टाकी बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे योगेश कदम यांच्यामुळे पाणी योजना मार्गी लावल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी योजनेसाठी प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.


पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. राजकीय वाद विसरून शिवसेनेनेही तटकरेंना मदत केली. त्या बदल्यात पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना देण्याचे ठरल्याची राजकीय चर्चा होती. परंतु आता हा विषय मागे पडलेला आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी तटकरे यांच्यावर टीका केली असावी. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ राजकीय वजन वाढविण्यासाठी रामदास कदम यांनी तटकरेंबाबत ही भाष्य वापरले असावे, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. एकंदरीत कोकणामध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेमधील वाद हा कायमच धगधगता राहील हे नक्की.

follow us