राऊतांनी मानसोपचार घ्यावे, सिंगापूरचे रुग्णालय खूप चांगले, सरकार खर्च करेल, फडणवीसांचं प्रत्युत्तर

राऊतांनी मानसोपचार घ्यावे, सिंगापूरचे रुग्णालय खूप चांगले, सरकार खर्च करेल, फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis On Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राज्यातील विविध प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत राऊतांनी चांगले मानसोपचार घ्यावे, त्यासाठी गरज पडली तर सरकार खर्च करेल अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी राऊतांवर केली आहे. फडणवीस आज एबीपी माझा च्या ‘माझा व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना स्वत:चा तपास करुन घेण्याची गरज आहे. आता अनेक चांगले मानसोपचार रुग्णालये सुरु झाली आहेत. जर आवश्यकता असेल तर आम्ही सरकारच्या वतीने सर्व खर्च करू. अगदी आवश्यकता पडली तर मला कोणीतरी सांगितले की, सिंगापूरचे मानसोपाचार रुग्णालय खूप चांगले आहे तिथेही त्यांना पाठवायचे असेल तरीही त्याकरिता सरकार सगळा खर्च सरकार देईल. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊतांवर केली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच मी जाहीर करतो, बजेठमध्ये त्याची तरतूद करतो पण त्यांनी तपास एकदा करुन घ्यावा. संजय राऊतांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावेत, असं या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होणार का?

तर दुसरीकडे भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होणार का? या प्रश्नावर देखील उत्तर देत स्पष्टपणे नाकार दिला. तसेच दिशा सालियान प्रकरणावर देखील त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

तर सरकार भूमिका घेईल

या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकारचे स्पष्ट आहे की, कोर्टात काय होईल आणि कोर्ट काय म्हणेल यावर सरकारची पुढची भूमिका असेल. आतातरी शासनाच्या स्तरावर किंवा पोलिसांच्या स्तरावर हा विषय नाहीये, हा कोर्टात विषय आहे. कोर्टाचा काही निर्णय येईल, त्यावेळी सरकार भूमिका घेईल. आता सध्या आम्ही कोर्टाकडे नजर ठेऊन आहोत. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू,न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube