मोठी बातमी! अजितदादांच्या अपघाताला महिना होत असतानाच धक्कादायक अहवाल समोर
आज महिना पूर्ण होत असतानाच आता या प्रकरणी DGCAचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. आज त्याला एक महिना पूर्ण झाला. या घटमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली. अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की घात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. आता या प्रकरणी DGCAचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या प्रकरणात अजित दादांच्या विमानचा अपघात कसा झाला हे समोर आलं आहे. लँडिंगच्या वेळी विमान हे पहिले एका झाडाला धडकलं आणि त्यानंतर खाली कोसळलं असल्याचं समोर आलं आहे.
या अहवालानुसार अपघातादरम्यान विमान अगोदर झाडावर आदळले. त्यानंतर विमान जमिनीवर आदळले. पुढच्याच क्षणी विमानाचा मोठा अपघात झाला. समोर आलेला हा अहवाल 22 पानांचा आहे. अपघातानंतर विमानाचा स्फोट झाला. या स्फोटानंतर उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाले असं या अहवालातातून समोर आलं आहे. याच अहवालात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान, पायाभूत सुविधा, ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याचा तात्पुरता निष्कर्ष काढण्यात आला आहे. अपघाताचं अंतिम कारण CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होणार आहे.
मी अजितदादांच्या अपघाती निधनावर बोलतो त्याला माझ्या पक्षातील लोकांचा विरोध, मिटकरींचा रोख कुणाकडं?
अजितदादांच्या विमान अपघाताची काही संभाव्य कारणं या प्राथमिक अहवालात सांगण्यात आली आहेत. यामध्य VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता, अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा, टेबल-टॉप रनवे तसेच फिकट मार्किंग, मानवी घटक/दृश्य भ्रम (visual illusion), MET माहितीची मर्यादित अचूकता अशी काही या अपघाताची कारणं आहेत. विमानतळावर रनवे मार्किंग फिकट फिकट होती.
सोबतच रनवेवर सैल खडी, पुरेशी कुंपण/सीमा भिंत नाही असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. यासह विमानात VIP/चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुरक्षा व नेव्हिगेशन सुविधाही बारामतीच्या विमानतळावर अपुरी आहे. विमानाने तत्काळ नियंत्रण गमावल्याचाही संकेत या तात्पुरत्या अहवालात देण्यात आला आहे. दरम्यान, आता या तात्परुत्या अहवालानंतर भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठराणार आहे.
