रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी; थेट राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

  • Written By: Published:
रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी; थेट राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Rohini Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीस सुरुवात केली आहे. आज नवे पदाधिकारी नियुक्त केले आहेत. आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची विद्या चव्हाण यांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत. शरद पवार गटाकडून जळगावमध्ये खडसेंना बळ देण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) ने आज पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात बीडमध्ये धनंजय मुंडेंना आव्हान देण्यासाठी बबन गित्ते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर रोहिणी खडसेंवर महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. विद्या चव्हाण या गेल्या दीड वर्षांपासून या पदावर होत्या.

मुंडेंना आव्हान देणाऱ्या बबन गित्तेंना पवारांचे बळ; दिली मोठी जबाबदारी

भाजपमध्ये एकनाथ खडसे यांची कोंडी करण्यात आली होती. त्याचपद्धतीने त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना राजकीय बॅकफूटवर टाकण्यात आले होते. मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने रोहिणी खडसे यांना वडिलांच्या जागेवारी उमेदवारी दिली होती. परंतु त्यांना शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी पराभूत केले.

बारामती, अमेठी यंदा खालसा करणारच! भाजपने बांधला चंग; 160 जागांसाठी खास फिल्डिंग

मुलगी पराभूत झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना ताकद देत थेट विधानपरिषदेवर पाठविले आहे. आता त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केली आहे.रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. तर सध्या संत मुक्ताई साखर कारखान्याच्या (घोडसगाव) संचालक आहेत. त्यांचे वकिलीचे शिक्षण झालेली आहे. खडसे याही ओबीसी समाजातून येतात. त्याचा फायदा शरद पवार गटाला होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube