Jayant Patil ED Enquiry : रोहित पवारांचं वक्तव्य बालिशपणाचं; राम शिंदेची टीका

Jayant Patil ED Enquiry : रोहित पवारांचं वक्तव्य बालिशपणाचं; राम शिंदेची टीका

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडी नोटीस पाठवली होती. जयंत पाटलांना IL&FS प्रकरणात ईडीकडून ही नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, ईडीने जयंत पाटील (Jayant यांची काल चौकशी केली. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक ट्विट केलं होतं. यावरून आता भाजप आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी रोहित पवारांना टोला लगावला. रोहित पवार यांचं वक्तव्य हे बालिशपणाचं आहे, अशी टीका त्यांनी केली. (Rohit Pawar comments on Jayant Patils ED investigation, Ram Shinde criticizes Pawar)

शिंदे म्हणाले की, आमदार रोहित पवारांचं वर्तन हे बालिशपणाचं आहे. बालिशपणे त्यांनी ट्विट केलं आहे. ते बायडेनवर बोलतात. झेलेन्सकीवर बोलतात. पुतीनवर बोलतात. ज्या पक्षांचा कर्नाटक निवडणुकीश दुरूनही संबंध नाही. ते पक्ष म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे सेना. त्यांना कर्नाटक निवडणुकीवर बोलण्याचा अधिकार नाही. कर्नाटकच्या रणांगणात राष्ट्रवादी, आणि ठाकरे सेना नव्हतीच. तिथं कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात लढत झाली होती. त्यांनाच बोलायचा अधिकार आहे, असं राम शिंदे म्हणाले.

दलित-आदिवासी राष्ट्रपती बनवण्यामागे BJP चा स्वार्थ; नव्या संसद सदनाच्या उद्घाटनवरून खर्गेंची टीका

राजकीय सुडासाठी ईडीचा गैरवापर होतो. विरोधकांनी जरा विरोधात बोललं की त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागतो, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. अशातच जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली. यावर बोलतांना शिंदेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, विरोधात बोलणं आणि नोटीसा येणं, याचा संबंध नाही. तुमचे आर्थिक व्यवहार चांगले असतील तर ईडीची नोटीस येणार नाही. ईडीची नोटीस येणं हे गंभीर आहे. ईडीची नोटीस कुणालाही येत नाही.

ईडीची नोटीस येण्याआधी ईडीकडून सगळे व्यवहार तपासले जातात. महाराष्ट्रात इकॉनॉमिक्स विंग महाराष्ट्रात काम करते. त्याच्यानंतर ईडी काम करते. काही संशयास्पद व्यवहार आढळले तरच ईडी चौकशी लागते, जयंत पाटील यांनी काही केलं नसेल तरते निर्दोष सुटतील.

शिंदे म्हणाले, जयंत पाटील यांनी ईडीची नोटीस आल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आंदोलनाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं. जे आंदोलन केलं, ते आपलं पितळ उघडं होतं की, काय या भीतीपोटी केलेलं आंदोलन आहे. आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, असं दाखवण्याचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, अशी टीका राम शिंदे यांनी केली. दरम्यान, आता राष्ट्रवादीकडून यावर प्रतिक्रिया येते, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube