रोहित पवारांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदी निवड

रोहित पवारांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदी निवड

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला आहे. आजोबांपाठोपाठ नातवाचीही क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे. असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर झाली.

या बैठकीत महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. रोहित पवार हे असोशिएशनचे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली असून अध्यक्षपदी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. तर भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये रोहित पवारांची एंट्री झाली आहे.

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पवार-शेलार गटाच्या अमोल काळे यांची निवड झाली होती. त्यांनी माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा पराभव केला पराभव केला होता. अमोल यांना 183 तर संदीप यांना 158 मते पडली होती. जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर कार्यकारिणीत निवडून आले होते.

आशिष शेलार आधी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत होते आणि त्यांना शरद पवार यांच्या ग्रूपचा पाठिंबाही मिळाला होता. पण शेलार यांची बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवडणूक झाली. नव्या क्रीडा नियमांनुसार एका व्यक्तीला एका खेळाच्या प्रशासनात एकच पद भूषवता येणार आहे. त्यामुळे शेलार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube