मी देखील अयोध्य दौरा केला; सरकारचा अयोध्या दौरा केवळ राजकीय इव्हेंट न ठरता….; रोहित पवारांची खोचक टीका

मी देखील अयोध्य दौरा केला; सरकारचा अयोध्या दौरा केवळ राजकीय इव्हेंट न ठरता….; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar on Ayodhya tour : शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाचे आमदार हे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) असणार आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्या संदर्भात आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटासह अनेकांनी टीका केली. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. मी देखील अयोध्य दौरा केला आहे. मात्र, आपल्या सरकारचा अयोध्या दौरा केवळ राजकीय इव्हेंट न ठरता सरकार श्रीरामांची शिकवण आत्मसात करत आपल्या जनतेस प्राधान्य देईल, ही अपेक्षा, अशा शब्दात त्यांनी खोचक टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि मंत्र्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यावरून टीकेच्या फैरी झडत आहेत. रोहित पवार यांनीही याबाबत ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. राज्यात शेतकरी त्रस्त असून सरकार राजकीय ईव्हेंन्टस करण्यात व्यस्त असल्याचं ते म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, काल मराठवाडा विदर्भासह राज्याच्या बऱ्याच भागात गारपीटीसह अवकाळी पावसाने हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून गेल्या महिन्याभरात दोनदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असल्याने मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारने त्वरित दिलासा देण्याची गरज आहे.

अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, असं अधिवेशन काळात सांगण्यात आलं होतं. परंतु, त्यादरम्यान, दोन-तीनदा अवकाळी पावसाने झोडपले तरी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले नाहीत, असंही रोहित पवार म्हणाले.

त्यांनी पुढं लिहिलं की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदानामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊन भाव पडले. मधल्या काळात अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. आज राज्यात शेतकरी त्रस्त आणि सरकार राजकीय ईव्हेन्टस करण्यात व्यस्त आहे, अशी टीका केली.

पत्रकारांच्या गराड्यात अजितदादा म्हणाले, मला पुन्हा-पुन्हा नॉटरिचेबल म्हणू नका

दरम्यान, मुख्यमंत्र्यासह अर्धे मंत्रिमंडळ अयोध्येचा दौरा करत आहे. मी स्वत: देखील अयोध्येला जाऊन आलो असून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले असता एक ऊर्जा मिळते, कामाची प्रेरणा मिळते. प्रभू श्रीरामांनी नेहमीच आपल्या जनतेस पहिले प्राधान्य दिले. आपल्या सरकारचा अयोध्या दौरा केवळ राजकीय इव्हेंट न ठरता सरकार श्रीरामांची शिकवण आत्मसात करत आपल्या जनतेस प्राधान्य देईल, ही अपेक्षा, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube