कोण पवार, असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला रोहित पवार यांचे टोले…

कोण पवार, असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला रोहित पवार यांचे टोले…

लढत तुल्यबळांमध्ये होत असते, राजकीय कारकीर्दीत पवारांचं वय अधिक, निवडणुकीचं वय हास्यास्पद, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Mishra) यांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, मंत्री मिश्रा यांनी शरद पवारांना माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यावर रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावर रोहित पवारांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Pawar’s Speak on the Minister who says who is Pawar)

रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले, “लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मस्तवाल मुलाचा बाप’, अशी ‘ओळख’ करून देण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर कधी आली नाही, हे सत्ता डोक्यात भिनलेल्या केंद्रीय
गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना राज्यातल्या एखाद्या भाजप नेत्याने सांगण्याची गरज आहे.

…तर लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकेल; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

आपल्या मुलाने केलेल्या ‘कर्तृत्वावर’ वडील म्हणून राजीनामा दिला असता तर त्यांना गांभीर्याने घेतलं असतं.. राहिला प्रश्न त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा. तर लढत ही तुल्यबळांच्यात होत असते. आदरणीय पवार साहेबांची राजकीय कारकीर्द मिश्रा यांच्या वयापेक्षा जास्त आहे, त्यांनी साहेबांना विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान देणं हे निव्वळ हास्यास्पद आहे. त्यांच्या वक्तव्याची बातमी झाली यातच त्यांनी समाधान मानावं, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.

सतेज पाटलांचा आठ दिवसांपूर्वीच इशारा अन् कोल्हापूरात दंगल

काय म्हणाले होते अजय कुमार मिश्रा :
मी शरद पवार यांना ओळखत नाही. 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. तसेच शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवून दाखवावी.

Prabhas: अखेर प्रभासचा लग्नाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘पवित्र स्थळी…’

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर भागात ३ ऑक्‍टोबर 2021 रोजी शेतकरी आंदोलनावेळी कारने चार शेतकर्‍यांना चिरडले हाेते. हिंसाचारात 8 जणांचा मृत्‍यू झाला होता. कारमध्‍ये केंद्रीय गृहराज्‍यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांचा मुलगा होता.

दरम्यान, मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केलेल्या विधानानंतर स्वत: शरद पवारांनी प्रतिक्रिया न देता आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर देत अजय मिश्रा यांना खडसावून बोलले आहेत. त्यावर आता अजय मिश्रा काय बोलतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube