सानप यांच्यासाठी शिवसेना मैदानात, सांगलीतील सभेला जोरदार प्रतिसाद!
Sachin Sanap Sangli Rally; पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारार्थ सांगली शहरात शिवसेनेची जाहीर सभा पार पडली.
Sachin Sanap Sangli Rally: सांगली: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अधिकृत पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारार्थ सांगली शहरात शिवसेनेची (Shiv Sena) जाहीर सभा पार पडली. या सभेला शिक्षक मतदार आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. या मेळाव्यात उपस्थित सर्व प्रमुख नेत्यांनी शिक्षक मतदारांशी संवाद साधत सानप यांना पहिल्या पसंती क्रमांकाचे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.
मोठी बातमी! कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, सात जणांना अटक
या प्रचार सभेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) उपस्थित होते. सभेला संबोधित करताना दोन्ही मंत्र्यांनी सानप यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, वेतनाचे मुद्दे, पेन्शन योजना आणि विनाअनुदानित शाळांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सानप यांच्यासारखा अभ्यासू व आक्रमक प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे अत्यंत गरजेचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
शिवसेना सदैव शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून, सानप यांच्या माध्यमातून शिक्षकांचा आवाज विधिमंडळात अधिक प्रभावीपणे मांडला जाईल, असा विश्वास यावेळी सामंत व देसाई यांनी व्यक्त केला.
माधुरीने रेणुका आणि प्रिया सोबतच्या सेटवरील धम्माल आठवणींना कोण होणार करोडपतीच्या मंचावर दिला उजाळा!
यावेळी मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांनी सभेत मार्गदर्शन करताना सचिन सानप हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. चिवटे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मी स्वतः या निवडणुकीत सचिन सानप यांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने उतरलो आहे. ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चे 10 हजारांपेक्षा अधिक नोंदणीकृत शिक्षक मतदार सचिन सानप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
या सभेला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पुणे विभागातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, स्वाभिमानी शिक्षक सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिक्षक मतदार उपस्थित होते.