‘लोक त्यांची जागा त्यांना दाखवून देतील’, धनंजय मुडेंची खिल्ली उडवत संदीप क्षीरसागरांची टीका

‘लोक त्यांची जागा त्यांना दाखवून देतील’, धनंजय मुडेंची खिल्ली उडवत संदीप क्षीरसागरांची टीका

Sandeep Kshirsagar : राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर अनेक मातब्बर आमदार अजित पवार गटात गेले. त्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. दरम्यान, आज शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर जोरदार टीका केली. आता हे लोक जेव्हा लोकांमध्ये मत मागायला जातील, तेव्हा लोक त्यांची जागा त्यांना दाखवून देतील, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी जाहीर केल्याप्रमाणं आज बीडमध्ये सभा सुरू आहे. या सभेत बोलतांना क्षीरसागर यांनी नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुंडे यांच्या भाषणाची स्टाईल मारत, हातवारे करत क्षीरसागर यांनी मुंडेंची खिल्ली उडवली. ते म्हणाले, काय भाषण करायचे! भाषणात सांगायचे, कुणाचा पण नाद करायचा, पण साहेबांचा नाद करायचा नाही. पण, त्यांनी केलेलं हे भाषण नीटपणे त्यांनाच समजलं नाही. जनता पवार साहेबांसोबत आहे. आणि हे साहेबांना सोडून गेले. जेव्हा आपण निवडणुकीला उभं राहतो, तेव्हा पक्षाची भूमिका घेऊन आपण लोकामध्ये जातो. त्या भूमिकेला लोक मत देत असतात. आता हे जेव्हा लोकांध्ये मत मागायला जातील, तेव्हा लोक त्यांची जागा त्यांना दाखवून देतील, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.

CM Eknath Shinde : सरकार पडेल म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले; अजित पवारच इकडं आले; शिंदेंचा टोला 

राजकारणात भूमिका सर्वांत महत्वाची असते. जिल्ह्यात आम्ही स्थानिक निवडणुकांत आघाडी केली. मात्र, काहीही झालं तरी पवारासोबत राहिल, असा विश्वास जनतेला दिला होता. माझी पंचायत समिती गेली, जिल्हा परिषद गेली, पण साहेबांना सोडलं नाही. त्यांनी मला तिकीट दिलं, त्यांच्याच आशिर्वादामुळं मी निवडूण आलो. लोक मला ओळखायला लागले, डोक्यावर घ्यायला लागले, ही जादू माझी नाही, ही पवार साहेबांची जादू आहे. सध्याच्या पंचवार्षिकला परिस्थिती थोडी वेगळी दिसते. दरवर्षी सरकारं बदलत आहेत. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवेळी मला जयंत पाटील यांनी फोन केला होता. त्यावेळी शरद पवारांकडे परतणारा मी पहिला आमदार होतो. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याच पायापाशी राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आमच्याकडे साहेब आहेत
काही लोक म्हणाले की, आम्ही सत्तेत आहोत. आमच्यासोबत मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे? त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, आमच्याकडे साहेब आहेत. बीड आणि मराठवाड्यातील जनता स्वाभिमानी आहे. आयुष्यभर तुमच्यासोबत तुमच्या विचारांसबत राहील, असंही क्षीरसागर यांनी सांगतिलं.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube