म्हणून राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने भाजपाच्या मंत्र्यांला भाषणापासून रोखले
Bhagwat Karad Speak : केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) हे एका आयोजित कार्यक्रमा दरम्यान भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांचे भाषण सुरू केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chauhan) यांनी त्यांना भाषण करण्यापासून रोखले. तसेच हा जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रचाराचा नाही, असे मंत्री कराडांना सांगितल्याने तेथे एकच चर्चांना उधाण आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाच्या उदघाट्नचा कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, राष्ट्रवादीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
उष्माघात ठरू शकतो जीवघेणा, बचावासाठी हे उपाय जाणून घ्या
मंत्री कराड व सावे आल्यावर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सदस्यांची भाषणे झाली व त्यानंतर मंत्री अतुल सावे यांचे भाषण झाले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांचे भाषण सुरू झाले. मंत्री कराड यांनी भाषणादरम्यान केंद्रातील मोदी सरकार योजनांच्या माध्यामताून गरिबांना कशी मदत करतात हे सांगायला सुरूवात केली.
महाडिकांनी रडीचा डाव खेळायला नको होता; सतेज पाटलांचा हल्लाबोल
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार चव्हाण यांनी मंत्री कराडांचे चालू भाषण थांबवले. चव्हाण यांनी कराड यांना हा जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रचाराचा नाही असे बोल देखील सुनावले. मात्र यानंतरही कराड यांनी केंद्र सरकार कशा पद्धतीने गरजू वंचिताना मदत करत आहे याबाबत माहिती देणे सुरूच ठेवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या व ते पाहून माजी खासदार खैरे यांनी देखील टाळ्या वाजवल्या. मात्र हे पाहताच बाजूला बसलेले आमदार सतीश चव्हाण यांनी खैरेंचा हात पकडून त्यांना टाळ्या वाजवण्यापासून रोखले.