Sanjay Raut : राज्यातील कायदा-सुव्यवस्था काहींच्या कोठ्यावर नाचतेय; राऊतांचा संताप

  • Written By: Published:
Sanjay Raut

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट व ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सध्या सामान्यांना आनंदाचा शिधा मिळत नाही तर तो आमदारांना खोक्यातून शिधा मिळतो, असे ते म्हणाले आहेत.

Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

तसेच राऊतांनी काल एक फोटो ट्विट केला होता. एका रक्ताच्या थारोळ्यातील मुलीचा फोटो त्यांनी ट्विट केला होता. यावरुन त्यांच्यावर बार्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे राऊत म्हणाले आहेत. त्या मुलीच्या आईने माझ्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. तिच्या आईने मला मदत मागितली, म्हणून मी हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला, असे ते म्हणाले आहेत.

Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

तसेच स्वत: च्या घरातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन केली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हि़डीओवरुन चौकशी केली जाते. पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचा फोटो ट्विट केला म्हणून एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो ही या राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचत आहे हे यावरुन स्पष्ट होते, असे राऊत म्हणाले आहेत.

हक्कभंग समितीला मी उत्तर देणार आहे. पण जे तक्रारदार आहेत त्यांनाच न्यायाधीश केले आहे. ज्यांच्यावर मी गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, ते राहुल कुल त्यांच्या या हक्कभंग समितीमध्ये समावेश आहे, असे राऊत म्हणाले आहेत. तसेच विधीमंडळाला चोरमंडळ मी कधीच म्हटलेले नाही. ज्यांनी खोके घेतले त्यांनी चोर म्हटलेले आहे, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube