सातारा जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी आज मतदान; गोरे बंधू, नाईक निंबाळकर आणि देसाई-पाटणकरांच्या लढतीकडे लक्ष

Satara District Bank Election; सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

Satara District Bank Election

Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 21 जागांपैकी 9 जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या 12 जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, बँकेच्या सत्तेवर कोण वर्चस्व मिळवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘मोदीजींचा बाप काढणाऱ्यांना महाराष्ट्र खड्ड्यात गाडेल’; एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीला इशारा

जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत असून, एकूण 2,021 मतदार मतदान करणार आहेत. विशेषतः माण, फलटण आणि पाटण तालुक्यांतील लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माण मतदारसंघात भाजपचे मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर आमनेसामने आहेत. तर पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि सत्यजित पाटणकर यांच्यात लढत रंगणार आहे.

रात्रीच्या अंधारात मृत्यूचा थरार! उड्डाणपुलाचा कठडा तोडून कंटेनर हॉटेलवर आदळला, दोघांचा जागीच अंत

या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि सातारा जिल्हा बँकेच्या सत्तेत कोण आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 115 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पार्थ पवारांनी रणनीती आखली? रणनीतीकार प्रशांत किशोरसोबत 4 तास मॅरेथॉन बैठक

दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असल्याने मतदानाच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

follow us