तुमचा बोलविता धनी नको, शरद पवार आणि कॉंग्रेसने मुंघलांप्रमाणे…; प्रसाद लाड यांची टीका

  • Written By: Published:
तुमचा बोलविता धनी नको, शरद पवार आणि कॉंग्रेसने मुंघलांप्रमाणे…; प्रसाद लाड यांची टीका

Prasad Lad On Manoj Jarange-Patil : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा लावून धरला आहे. अंतरवली सराटी गावात त्यांनी दीर्घकाळ उपोषण केलं होतं. त्यानंतर काल झालेल्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी फडणवीस यांना समज द्यावी. कारण ते कार्यकर्ते अंगावर घालत आहे, मराठा समाजाला उचकावण्याचं काम फडणवीस आणि अजित पवार करताहेत, अशी टीका त्यांनी केली होती. दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला.

जनतेच्या मनातला निकाल आपल्या बाजूने, आयोगाचा निकालही…; शरद पवार पवारांचं मोठं विधान 

मनोज जरांगे हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. कुणबीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. यावर बोलतांना लाड म्हणाले की, मराठा आरक्षणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा विचार मराठा समाजाने करण्याची गरज आहे. जरांगे-पाटील समाजासाठी काम करतात हे मान्य आहे. पण ज्या पद्धतीने तुम्हाला चालवलं जात आहे, त्याचा निषेध करतो. जरांगेंना ओबीसींतून आरक्षण हवे आहे. बोलवता धनी तुमच्याकडून काम करून घेत आहे. मराठा समाजात फुट पाडण्याचं काम मोगलांनी केल. ते काम कॉंग्रेसस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात जरांगे-पाटलांनी करू नये, असं लाड म्हणाले.

2018 मध्ये फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं. पण ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा न केल्यानं आरक्षण रद्द रद्द झालं, असा आरोप त्यांनी केला.

कालच्या जरांगेच्या सभेला मोठी गर्दी झाला होती. यावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मराठा समाजासाठी गर्दी ही नवीन गोष्ट नाही. आरक्षण मिळालं पाहिजे, ही समाजाची भावना आहे. ही गर्दी कुठल्याही नेतृत्वाच्या मागे नाही, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेली गर्दी आहे, अशी खोचक टीका त्यांनी केला.

मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. यावर बोलतांना लाड म्हणाले की, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहात, हे अशोभनीय कृत्य आहे. शरद पवार 4 वेळा, विलासराव देशमुख 9 वर्षे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब भोसले हे एवढी वर्ष मुख्यमंत्री राहिले. पण, अण्णासाहेब पाटील यांनी 1983 मध्ये मराठा आरक्षणाची मागणी केली आणि स्वत:चा देह त्यागला. त्यानंतरही मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले नाही, 50 वर्षांच्या इतिहासानंतर एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले, असं ते म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube