जनतेच्या मनातला निकाल आपल्या बाजूने, आयोगाचा निकालही…; शरद पवार पवारांचं मोठं विधान

  • Written By: Published:
जनतेच्या मनातला निकाल आपल्या बाजूने, आयोगाचा निकालही…; शरद पवार पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत (NCP) बंड करून ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आणि पक्षचिन्हावरच दावा ठोकला आहे. याबाबत सध्या सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आता शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) याबाबत भाष्य करतांना निकाल आपल्याच बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

Letsupp Special : गुणरत्न सदावर्ते अन् देवेंद्र फडणवीस खरंच मित्र आहेत? 

आज राष्ट्रवादी कॉंग्रेचचा पदाधिकारी मेळावा मुंबई झाला. या मेळाव्याला संबोधित करतांना शरद पवारांनी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष म्हणून राखीताई जाधव यांची निवड केली. यावेळी बोलतांनाा ते म्हणाले की, मी दोन तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलं की कधी काळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला. फरक एवढाच आहे की, तुम्ही ज्यांची निवड केली, ते कधी तुरुंगात गेले नव्हते, दुसऱ्या बाजूचे कुठं गेलेत, हे तुम्हाला माहित आहे, अशा शब्दात त्यांनी समीर भुजबळांवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, आता त्यांनी पक्षावर आणि चिन्हावरच दावा ठोकलाय. त्यामुळं सुप्रीम कोर्टात आणि निवडणुक आयोगात खऱ्या राष्ट्रवादीला मोठा संघर्ष करावा लागत आहेत. पण, जर सामान्या माणसाच्या मनातला निकाल वाचला तर तो खऱ्या राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. मला खात्री आहे की, जेव्हा निवडणुक आयोगाचा निकाल लागेल, तेव्हा तो आपल्या बाजूने लागेल. निष्णात वकील आपली बाजू कोर्टात मांडत आहेत, असं पवार म्हणाले.

2-3 राज्ये सोडली तर भाजप कुठंच नाही
यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपने पाडलं. त्यासाठी आमदार फोडले. आता तुम्ही देशाचा नकाश समोर ठेवा आणि प्रत्येक राज्याची स्थिती काय आहे, याचा अंदाज घ्या.. आज केरळमध्ये भाजप नाही, तमिळनाडूत भाजप नाही. कर्नाटकात भाजप नाही. आंध्रप्रदेश, तेलंगणात, दिल्ली, पंजाबमध्येही भाजप नाही. मध्यप्रदेशातही भाजपने आमदार फोडले होते. राजस्थानमध्येही भाजप नाही. मग भाजप आहे तरी कुठं? असा खोचक सवाल त्यांनी केला.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर
देशातील अनेक राज्यामध्ये भाजपचे सरकार नाही. 2-3 राज्ये सोडली तर भाजप कुठंच नाही. देशात भाजप दिवसेदिवस कमी होते चालली, असं ते म्हणाले. भाजपकडून सत्तेचा विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी गैरवापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने मुंबईत कंत्राटी तत्वावर पोलीस भरती करण्याची जीआर काढला. यावरही पवारांनी भाष्य केल. ते म्हणाले, याच सरकारच्या काळात कंत्राटी पोलीस भरती ऐकली… मी देखील गृहमंत्री होतो, पण, आतापर्यंत कधी कंत्राटी पोलीस भरती मी ऐकली नाही. असं पवार म्हणाले. आता कंत्राटी भरती केली तर अकरा महिन्यांनी त्यांनी काय करायचं? कंत्रााटी पध्दतीने पोलीस भरती करण्याचं काम अद्याप देशात कोणी केलं नाही, पण, राज्यात भाजप करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube