ब्रेकिंग : शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; एकत्र येण्याबाबत सुप्रिया अन् अजितने बसून ठरवावं…

ब्रेकिंग : शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; एकत्र येण्याबाबत सुप्रिया अन् अजितने बसून ठरवावं…

Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत शरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar ) दिले. आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत, त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जावं वाटतं, असं विधान पवारांनी म्हटलं. तसंच एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं, असंही पवार म्हणाले.

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’! ‘वामा’ चित्रपटातील आयटम साँग प्रदर्शित 

शरद पवारांनी नुकतीच इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ते म्हणाले, आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं, अजित पवारांसोबत जावं, तर दुसऱ्या गटाला वाटतं की, अजितदादांसोबत जाऊ नये, असं पवार म्हणाले.

सगळ्यांची विचारधारा एकच
संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की, विरोधी पक्षासोबत बसायचं यांचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं, असंही पवार म्हणाले. पुढं बोलताना ते म्हणाले, पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.

माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा, असं पवार म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
यापूर्वी अनेकदा अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं होतं. काही वेळाला त्यांच्यात गुप्त बैठकाही झाल्या होत्या. या भेटी एकप्रकारे राजकीय जवळीक वाढवण्याचे संकेत देतात. त्यामुळं राजकीय मतभेद बाजूला ठेवून शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकीय जाणकार सांगतात. अशातच पक्षातल्या एका गटाला अजितदादांसोबत जावं असं वाटतं असं विधान पवारांनी केलं. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube