NCP चे दोन गट एकत्र येणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

NCP चे दोन गट एकत्र येणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

Sharad Pawar On ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. त्यामुळं राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी अर्थखातं आपल्याकडे किती दिवस राहिलं, हे सांगता येत नाही, असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. तर काल शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपसोबत गेलेले आमदार स्वगृही परत येण्याच्या विचारात आहे, असं वक्तव्य केलं. यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं.

आज जुन्नरमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पॅचअप होणार का, असा सवाल केला. त्यावर बोलतांना पवार म्हणाले, जे आमदार आणि नेते भारतीय जनता पार्टीच्या मनात आहेत, ते राष्ट्रवादीत असू शकत नाही. तुम्ही भाजपसोबत जायची भूमिका घेतली आणि आता तडजोड करत असाल तर आम्ही ते स्वीकारणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये समेट घडून येण्याची शक्यता कमी आहे.

Ajit Pawar : ‘छगन भुजबळ अन् मी गप्पा मारत होतो’; ‘त्या’ वादावर अजितदादांचा फुलस्टॉप ! 

अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर दावा ठोकला. त्यामुळं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार की, अजित पवार यावरून दोन गटात जोरदार वाद सुरू झाले आहे. यावरही पवारानी भाष्य केलं. राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचा संस्थापक अध्यक्ष कोण आहे, हे सर्वांना ठाऊक आहे, असं ते म्हणाले.

पवार म्हणाले, मी महाराष्ट्रात फिरतोय. सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे. सामान्य लोक काय विचार करतात, हे महत्वाचं आहे. आता काहींनी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधला अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू शकत नाही. पण आज महाराष्ट्रात आणि बाहेर सुध्दा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे, ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळं लोकांची भावना ही अनुकूल आहे, असं आमचे लोक सांगतात. त्यात तथ्य़ आहे, असं पवार म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी प्रदुषण मंडळाने रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीला नोटीस पाठवून दोन प्लांट बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर हायकोर्टाने या कंपनीवर 6 ऑक्टोबर पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. याविषयी पवारांना विचारले असता, त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube