शिवरायांच्या वाघनखांवरून वाद; शरद पवार म्हणाले, ‘मला काही…’

शिवरायांच्या वाघनखांवरून वाद; शरद पवार म्हणाले, ‘मला काही…’

Sharad Pawar On Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखं (waghnakh) लंडनहून परत आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे आज ब्रिटनला जाणार आहेत. त्यानंतर सर्व प्रक्रिया झाल्यावर वाघनखं 16 नोव्हेंबरला तीन वर्षांसाठी भारतात येणार आहेत. दरम्यान, वाघनखांवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं दिसत आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि आदित्य ठाकरे यांनी ब्रिटिश म्युझियममधील वाघाचे डोके शिवरायांचे नसल्याचा दावा केला आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं.

Bombay High Court मध्ये जिल्हा न्यायाधीश पदांच्या 8 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,94,660 रुपये पगार 

आज जुन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांना वाघनखांविषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले की, मला वाघनखांबद्दल काहीच मााहिती नाही. त्यातलं ज्ञान मला नाही. मात्र, इंद्रजित सावंत या इतिहास जाणकारांचे याबद्दल वेगळं मत आहे. हे मी टीव्हीवर पाहिलं आहे. असं असलं तरी मला प्रत्यक्षात त्याबाबत माहिती नाही. तसंच वाघनखांबद्दल वाद निर्माण करावा, असं मला वाटत नाही. पण, सावंत यांचे काही वेगळे मत असेल तर त्यावर विचार व्हायला हवा, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.

इंद्रजित सावंत काय म्हणाले

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी वाघनखांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, अफझल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाघनखं तसंच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इसं 1911 पर्यंत होती. कारण, ही श्सत्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती. त्याविषयीच्य नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण, आत्ता जे व्हिक्टोरिया अॅंड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखं महाराष्ट्र सरकार भारतात परत आणत आहेत, ती अफलज खानाचा वध केलेली वाघनखं नाहीत, हे स्पष्ट आहे.

साताऱ्यात इ.स. 1911 पर्यंत वाघनखं असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत. मग इस 1919 च्या आधी व्हिक्टोरिया अॅंड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखं ही शिवाजी महाराज यांची असूच शकत नाही, असं सावंत म्हणाले.

तर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे की, फक्त शिवकालीन आहेत? याचा खुलासा करावा, असं आव्हानं केलं. दरम्यान, या सगळ्या आरोपांवर आता राज्य सरकार काय उत्तर देतं हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube