Bombay High Court मध्ये जिल्हा न्यायाधीशपदांच्या 8 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,94,660 रुपये पगार

Bombay High Court मध्ये जिल्हा न्यायाधीशपदांच्या 8 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 1,94,660 रुपये पगार

Bombay High Court Bharti 2023: कायद्याचं शिक्षण घेतलेल्या अनेक उमदेवारांना वकिली केल्यापेक्षा न्यायाधीश म्हणून काम करण्याची इच्छा असते. आता अशा उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच एकूण 8 जिल्हा न्यायाधीश (District Judge) पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची पद्धत याबद्दल तपशीलवार नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे.

पदाचे नाव – जिल्हा न्यायाधीश

एकूण पदांची संख्या – ८

शैक्षणिक पात्रता –
उमदेवार हा भारताचा नागरिक असावा.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कायद्याचे शिक्षण झालेलं असावं.
उमदेवाराला मराठी, इंग्रजी या भाषांची उत्तम जाण असावी. अन्य माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

वय श्रेणी:
किमान: 35 वर्षे, कमाल: 48 वर्ष

VIDEO : मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदच्या साथीदाराची घालून हत्या…

अर्ज/परीक्षा शुल्क:

ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹1000
SC/ST: ₹500
PWD/महिला: कोणतेही शुल्क नाही.

आवश्यक कादपत्रे-
कायद्याची पदवी, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र

पगार –
उमेदवाराला 1,44,840 रुपये ते 1,94,660 रुपये पगार आणि इतर भत्ते दिले जातील.

फी पेमेंट मोड:

तुम्ही ATM/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता. कृ

नोकरी ठिकाण– मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
20 ऑक्टोबर 2023 ( सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत)

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाइट-
bombayhighcourt.nic.in

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1emT9Yllo9MYbw2t2uej_OYUcGQxzR0zd/view

https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20230930103030.pdf

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube