‘हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही…’, शरद पवारांचा मोदींना थेट इशारा

‘हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही…’, शरद पवारांचा मोदींना थेट इशारा

Sharad Pawar on PM Modi : निवडणुक प्रचाराच्या काळात मोदींनी मला भटकती आत्मा म्हटलं होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो आणि हा आत्मा आता तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींना दिला.

आता जेपी नड्डा केंद्रात मंत्री; कोण होणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष? 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज नगर शहरात 25 वा वर्धपन दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होतं. या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंकेंसह सर्व निर्वाचित खासदार उपस्थित होते. यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, आजचा दिवस वर्धापन दिन आहे. सुदैवाने हा आनंद साजरा करण्यासाठी आपले दहापैकी आठ खासदार निवडून दिले. 25 वर्षापूर्वी पक्ष स्थापन केला तेव्हा तीन महिन्याच्या आत जनतेनं सत्तेवर बसवलं. 17-18 वर्ष सतत जनतेनं सेवा करण्याची संधी. केवळ राज्यातच नाही तर केंद्रातही काम करण्याची संधी मिळाली, असं पवार म्हणाले.

‘विश्रांती घ्या म्हणणाऱ्यांनाच पवार साहेबांनी विश्रांती दिली…’, रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा 

मोदींना जनतेची साथ नाही
पवार म्हणाले, मोदींनी शपथ घेतली. पण, त्यांना जनतेची साथ नव्हती. बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. निवडणुक प्रचारात मोदी भारत सरकार नाही, मोदी सरकार म्हणायचे. मोदी सरकार की गॅंरटीचा नारा दिला. मात्र आता मोदींची गॅरंटी राहिले नाही, असा टोलाही पवारांनी लगावला.

… तुम्हाला सोडणार नाही
पवार म्हणाले, आम्ही टिपणी करतो. मात्र टीका-टिपणी करतानाही मर्यादा बाळगळतो. मोदीजी मला भटकता आत्मा म्हटले होतं. मात्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. आता हा आत्मा तुम्हाला कधी सोडणार नाही, असा इशारा देत मोदींनी शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला असली वक्तव्य शोभत नाही, असंही पवार म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिराचा वापर केला. त्याचे परिणाम मोदींना भोगावे लागत आहे. अयोध्येत मोदींनी दिलेल्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावं लागलं, असंही पवार म्हणाले.

विखेंना लगावला टोला…
पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात कोणीतरी लंकेना म्हटलं इंग्रजी बोलता येतं का? संसदेत इंग्रजीतच बोलावं लागतं असं काही नाही. हिंदीतही बोलता येतं. तुमच्या मातृभाषेतही बोलता येतं, अशा शब्दात पवारांनी सुजय विखेंच नाव न घेता यांना सणसणीचत टोला लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज