आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांचे मोठे विधान

आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांचे मोठे विधान

कोल्हापूर : आगामी निवडणुका म्हणजेच 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत. तसेच येत्या काळात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच शिवसेना या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. दरम्यान, याबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही, असे त्यांनी यावेळी भाष्य केले.

सत्ताधाऱ्यांवर टीका
विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या सत्ताधाऱ्यांमधील नेत्यांना शरद पवार यांनी शाब्दिक टोला लगावला आहे. सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं. पण सत्ता पक्षातीलच काही लोक विरोधकांना धमकावत आहेत. तुरुंगात टाकण्याच्या, जामीन रद्द करण्याच्या धमक्या देत आहेत. हे काही योग्य नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube