Shinde Government : मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिंदे-फडणवीसांचा प्लॅन; 125 कोटी रुपये येणार खर्च

Shinde Government : मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिंदे-फडणवीसांचा प्लॅन; 125 कोटी रुपये येणार खर्च

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी तब्बल 125 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे. आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याच बोललं जातं आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis government has decided to reach out to at least 2.7 million people in the next two months by spending over 125 crore)

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या दोन महिन्यांत म्हणजे 18 जुलैपर्यंत राबविण्यात येणार्‍या ‘शासन आपल्या दारी’ (सरकार तुमच्या दारी) या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकार तब्बल 51.91 कोटी खर्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील 36 जिल्ह्यांतील विकास कामांसाठी राखून ठेवलेल्या एकूण ₹15,150 कोटींपैकी 30 कोटी खर्च करण्यासाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.

UPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात पहिली; तिन्ही टॉपर मुलीच

सोबतच सरकारने आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 70 कोटी रुपये बाजूला काढण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास कामांसाठी खर्च करावयाच्या 5 कोटींपैकी 20 लाख रुपये मतदारांपर्यंत पोहचण्याच्या कार्यक्रमावर खर्च करता येणार आहेत. या सर्व माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारच्या हजारो योजनांचा विस्तार करुन त्याचे फायदे जनतेपर्यंत पोहचविण्याचा राज्य सरकारचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरे रवाना

एका बाजूला विरोधक रणनीती आखत आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या मुद्द्यांवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच भाजप-शिवसेना सरकारनेही मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी, सरकारचे काम पोहचविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 24 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube