सत्तेसाठी आमदार फोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला

सत्तेसाठी आमदार फोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला

मुंबई : सत्तेसाठी आमदार फोडून 56 वर्षांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, आपली अस्मिता असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवले असे म्हणत शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. येणारे नवीन वर्ष हे अन्याय सहन करण्याचे नाही. आपल्या रक्ताच्या थेंबा-थेंबात आक्रोश आहे. तो तसाच उफाळून दे.. कारण या आक्रोशाची आज महाराष्ट्राला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला गरज आहे.

यावेळी विचारे म्हणाले, एकनिष्ठ शिवसैनिकांनो हे नवे वर्ष अन्याय सहन करायचे नाही. घमेंडखोर गनीमांना त्यांची औकाद दाखवायला आपण कमी पडणार नाही याचा मला सार्थ विश्वास आहे असे म्हणत शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न विचारे यांनी केला आहे.

राजन विचारे यांनी पत्रात म्हंटले की, सत्तेसाठी आमदार फोडून 56 वर्षांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, आपली अस्मिता असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवले असे म्हणत शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. तर राज्यातील हक्काचे प्रकल्प बाहेर जात असल्याने राज्यातील तरुण बेरोजगार होत आहे.

नव्या वर्षात पदार्पण करताना आपण जुने वाद, भांडण विसरायचे असतात. वाद-भांडण असती तर विसरूनही गेलो असतो. पण अन्याय, जखमा, स्वार्था सत्ताकारण यांना कसे विसरायचे. ईडीचा धाक दाखवून शिवसेना फोडली, भूखंडाचे गैरव्यवहार, राज्यात महापुरूषांचा अवमान होत आहे, सच्चा शिवसैनिक अन्यायाविरोधात आवाज उठवतो तेव्हा त्याला अमानुष मारहाण केली जाते. खोटे गुन्हे दाखल केले जातात.

केंद्रात, राज्यात, कर्नाटकात त्यांचीच सत्ता असताना या महाराष्ट्राला कोणी वाली नाही, असा महाराष्ट्र पाहताना आपले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे हे जिथे कुठे असतील त्यांना किती वेदना होत असतील, असेही यात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube