विलासराव देशमुखांचा पराभव करणारे शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

Shivsena Ex MLA Prakash Devle: 1996 च्या विधान परिषद निवडणुकीत विलासराव देशमुख यांना पराभूत करून मोठा राजकीय उलटफेर घडवला.

  • Written By: Published:
Shivsena Ex MLA Prakash Devle no more

Shivsena Ex MLA Prakash Devle no more: शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते, माजी आमदार व पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश देवळे (Prakash Devle) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील प्रतिशिर्डी देवस्थान उभारण्याचे श्रेय त्यांना जाते. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

विलासराव देशमुखांना पराभूत करणारे देवळे

शिवसेनेतील कट्टर कार्यकर्ते म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या प्रकाश देवेळे यांनी 1996 च्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांना पराभूत करून मोठा राजकीय उलटफेर घडवला होता. विशेष म्हणजे हा पराभव केवळ अर्ध्या मतांनी झाल्याने त्या निवडणुकीची राज्यभर चर्चा रंगली होती.

1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी देशमुख आपल्या विधानसभा मतदारसंघातूनही हरले होते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, या लढतीत देवळे यांनी त्यांना मागे टाकले. एका वर्षात दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसल्याने देशमुख यांच्यावर मोठी राजकीय घालमेल झाली होती.

देवळे यांनी 1996 ते 2002 या कालावधीत विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवली. त्यांचा कार्यकाळ, तेव्हा झालेल्या अर्ध्या मतांच्या फरकातील निवडणूक आणि त्यांचा नंतरचा प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्मरणीय मानला जातो. (Shivsena Ex MLA Prakash Devle no more)


चित्रपट निर्मिती, धार्मिक कार्यातही योगदान

राजकारणासोबतच बांधकाम व्यवसाय, सांस्कृतिक उपक्रम, ऑर्केस्ट्रा, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांतही त्यांनी काम केले. प्रतिशिर्डी संकल्पनेतून त्यांनी धार्मिक व सामाजिक योगदान दिले. अलीकडेच नामदेव शिंपी समाजातर्फे त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

follow us